Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

निवडणुकीसाठी अभिनेता चिन्मय उदगीरकर ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर

Share

नाशिक । मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय हाती घेण्यात आल्या आहेत. प्रशासनाने येत्या निवडणुकीसाठी जिल्ह्याच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून अभिनेता चिन्मय उदगीरकर याची निवड केली आहे. जास्तीत जास्त मतदारांनी विशेेषत: तरुणांनी निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदाचा हक्क बजवावा, हा त्यामागील हेतू आहे.

लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकार्‍यांनी ‘वोट कर नाशिककर’ ही मोहीम हाती घेतली होती. परिणामी नाशिक लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा 60 टक्के इतके मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकीत देखील ‘वोट कर नाशिक’ कर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याद्वारे समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती नागरिकांना मतदानाचा हक्क बजवावा यासाठी आवाहन करत आहेत.

तसेच, जिल्ह्यातील 15 मतदारसंघात मतदान जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून निवडणुकीसाठी जिल्ह्याचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून अभिनेता चिन्मय उदगीरकर याची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात 19 – 29 या वयोगटातील तब्बल 19 लाख मतदार आहेत. या तरुण मतदारांना डोळ्यासमोर ठेवून ही निवड करण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!