Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

सिन्नर : दिव्यांग मतदारांसाठी तालुक्यात २९ खुर्च्या

Share

सिन्नर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग मतदारांची मतदान करताना होणारी गैरसोय टाळण्यासाठी सिन्नर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.लता गायकवाड यांच्या संकल्पनेतून २९ ग्रामपंचायतींनी अपंगांसाठीच्या विशेष खुर्च्या मतदान केंद्राच्या परिसरात उपलब्ध करुन दिल्या आहेत.

ग्रामपंचायत निधीतून अपंगांसाठी असणाऱ्या पाच टक्के निधीच्या तरतुदीतून या खुर्च्यांची खरेदी करण्यात आली असून नाशिक जिल्ह्यात सिन्नर पंचायत समितीने हा उपक्रम प्राधान्याने राबवला आहे. दिव्यांग मतदारांना निवडणूक केंद्रावर सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे या निमित्ताने पंचायत समितीकडून पालन करण्यात आले आहे.

वावीसह सिन्नर तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींनी या खुर्च्यांची खरेदी केली असून आरोग्य विभागाकडून आलेल्या अहवालानुसार गावे निश्चित करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!