चैत्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंगी गडावर भाविकांची मांदियाळी

0

वणी प्रतिनिधी : श्री सप्तश्रृंगी देवीच्या चैत्रीउत्सव यात्रेनिमित्ताने धुळे, जळगाव, नंदुरबार ह्या खानदेश भागातून तसेच मध्यप्रदेश राज्यातून हजारो भाविक पायी चालत कालपासून शहरात दाखल होऊ लागले आहेत. कळवण ते देवळा, लोहणेर, नांदुरी हे रस्ते गर्दीने अक्षरशः गजबजून गेले असून या भाविकांची चहा, नाष्टा, जेवण, पाणी यासाठी विविध सेवाभावी संस्था परिश्रम घेत आहे.

आदिशक्ती च्या चैत्र यात्रेस मोठ्या प्रमाणात भाविक पायी दर्शनासाठी येतात त्यात विशेषतः खानदेश वासीय यांची संख्या लक्षणीय असते, हे भाविक पायी यात्रा करून कळवण शहराच्या आसपास पोहचतात त्यावेळी लोहणेर, विठेवाडी, बेज फाटा ते कळवण शहर या ठिकाणी विविध सेवाभावी संस्था यात्रेकरु साठी अन्नदान करतात.

सप्तशृंगी गड येथील प्रतिष्ठित उद्योगपती राजाभाऊ शिंदे परिवार मागील ४ वर्ष पासून नियमितपणे यात्रा कालावधीत २४ तास भाविक भक्तांना पाणपोई वाटून शिंदे परिवार, नातलग, मित्र परिश्रम देतात. त्याचप्रमाणे राजाभाऊ शिंदे रोज सकाळी गरम पोहे वाटप करतात तर राजे डीजे मित्र मंडळ दरवर्षी लिबु सरबत वाटप करतात. यात्रेकरूच्या सेवेसाठी डॉ वसंतराव मेडिकल कॉलेज औषधे उपलब्ध करून देतात. इतर मंडळे चहा – बिस्किटे, पाणी, फळे वाटप करून आपली सेवा देतात हे विशेष.

बुधवार असल्याने आज जवळपास एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. दरम्यान सीसीटीव्ही असून देखील भुरट्या चोरांनी गर्दीचा फायदा उचलत भाविकांच्या मौल्यवान वस्तूवर डल्ला मारला.

सप्तशृंगी गडावर रोपवे गेट समोर भाविकांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्यास अनेक वेळा पोलीस प्रशासन शोध लावत होती. मात्र सप्तशृंगी गड येथील गेट समोर रोपवे ट्रॉली येथील कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक यांनी रंगेहाथ १२ वर्षीय मुलीला गळ्यातले मंगळसूत्र चोरी करतांना पकडले व त्या चोरी करणाऱ्या मुलीला पोलिसांचा ताब्यात देण्यात आले व पुढील कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, शिंदे, खाडे करत आहे.

भाविकांनी मौल्यवान दागिने, वस्तू दर्शनासाठी येतांना आणू नये असे आव्हान ट्रस्ट, पोलीस यांचे वतीने करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*