वीज पडून मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांना ४ लाखाची मदत

0

वाजगाव | शुभानंद देवरे : 
देवळा तालुक्यातील वाजगाव येथील हौशाबाई फकीरा कुवर यांचा वीज पडून मृत्यू झाला होता. या महिलेच्या कुटुंबियांना आपत्कालीन निधी अंतर्गत ४ लाख रुपयांची शासकीय मदत दि. १९ रोजी देण्यात आली. मदतीचा धनादेश देवळ्याचे तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांनी कुंवर कुटुंबियांच्या घरी जाऊन कुंवर कुटुंबीयांकडे सुपूर्त केला.

वाजगाव येथील रामेश्वर धरण परिसरातील सिताफळाचे बर्डे शिवारात राहणाऱ्या हौशाबाई फकीरा कुवर ( ७२ ) ह्या दि.१६ मंगळवारी सायंकाळी पाऊस सुरू झाला असतांना घरासमोरील झाडाखाली पावसात भिजत असलेल्या बकऱ्या सोडून त्यांना आडोश्याला बांधण्याच्या उद्देशाने घराबाहेर आल्या. झाडाखाली बांधलेली बकरी सोडत असतांना अचानक विज पडून त्यात हौशाबाई कुंवर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच बकरीही जागीच ठार झाली होती.

या घटनेचा त्वरित पंचनामा करून शासनाकडे अहवाल पाठवण्यात आला होता. शासननिर्णयानुसार आपत्कालीन निधी अंतर्गत ४ लाख रुपयांचा शासकीय मदतीचा धनादेश दि. १९ रोजी देवळ्याचे तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांनी साहेबराव कुंवर व सोमनाथ कुंवर यांच्या घरी जाऊन कुंवर कुटुंबीयांकडे सुपूर्त केला.

यावेळी तलाठी कुलदीप नरवाडे, वरिष्ठ सहायक जाधव, दिपक देवरे, संजय गायकवाड, अशोक देवरे, विश्वास महाले, भाऊसाहेब काकुळते, प्रदीप देवरे, शैलेंद्र देवरे, ज्ञानेश्वर नलगे, वसंत गवळी ग्रामपंचायत लिपिक एस.ए.देवरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*