Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

व्ही. एन. नाईक निवडणुक; दोन पॅनलमध्ये सरळ लढत होणार

Share

नाशिक । प्रतिनिधी
क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले असून दोन पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे.आज (दि.8)उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी 333 उमेदवारांपैकी 262 उमेदवारांनी माघार घेतली.

एकूण 29 जागांसाठी 71उमेदवार निवडणूक रिंंगणात आहेत. सत्ताधारी कोंडाजीमामा आव्हाड व हेमंत धात्रक यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनल तर पंढरीनाथ थोरे व तुकाराम दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत रंगणार आहे.

अध्यक्षपदासाठी कोंडाजीमामा आव्हाड व पंढरीनाथ थोरे तर सरचिटणीसपदासाठी हेमंत धात्रक व अभिजीत दिघोळे यांच्यात सरळसरळ लढत रंगणार आहे. मंगळवारी (दि.9) उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार असून चिन्हाचे वाटप केले जाणार असल्याची माहिती निवक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गजेंद्र सानप यांनी दिली.

नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रणधुमाळीस आता खर्‍या अर्थाने प्रारंभ झाला आहे.अध्यक्ष,उपाध्यक्ष,सरचिटणीस, सहचिटणीस,विश्वस्त व तालुका संचालक अशा एकूण 29 जागांसाठी एकूण 431 अर्ज दाखल झाले होते.छाननीमध्ये 44 अर्ज अवैध ठरल्याने 373 उमेदवारांचे अर्ज शिल्लक होते.यातील 8 उमेदवारांनी लवादाकडे दाद मागितली होती. यातील 3 अर्ज वैध धरले होते तर, 5 अर्ज अवैध ठरविण्यात आले होते.माघारीचा आज (दि.8) अंतिम दिवस होता. दिवसभरात विविध जागांसाठी 262 उमेदवारांनी माघार घेतली.

उमेदवारांची अंतिम यादी मंगळवारी सकाळी 11 वाजता प्रसिध्द केली जाणार आहे. यादी प्रसिध्द केल्यानंतर दुपारी 4 वाजता उमेदवारांना चिन्हाचे वाटप होईल. दरम्यान, माघारीनंतर सत्ताधार्‍यांनी 9 नवीन चेहर्‍यांना संधी देत प्रगती पॅनल उमेदवारांची घोषणा कोंडाजी आव्हाड व हेमंत धात्रक यांनी केली. सत्ताधार्‍यांविरोधात एकवटलेल्या विरोधकांनी एकत्र येत परिवर्तन पॅनलची घोषणा तुकाराम दिघोळे व पंढरीनाथ थोरे यांनी केली.

उपाध्यक्षासाठी तिरंगी लढत
माघारीनंतर 29 जागांसाठी 71 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.ते पुढीलप्रमाणे -अध्यक्ष- 2,उपाध्यक्ष-3,सरचिटणीस-2,सहचिटणीस- 2, विश्वस्त (6 जागा)- 14, नाशिक प्रतिनिधी (4 जागा)- 12,सिन्नर (3 जागा)- 8,दिंडोरी (3 जागा)- 8,निफाड (3 जागा) 6, येवला- (2 जागा) 5, नांदगाव (2 जागा)-4 व महिला प्रतिनिधी (2 जागा)-5.यामध्ये उपाध्यक्ष पदासाठी तिरंगी,नाशिक संचालकपदासाठी तिरंगी लढत होणार आहे.

प्रगतीचे पॅनल उमेदवार
अध्यक्ष-कोंडाजीमामा आव्हाड,उपाध्यक्ष-प्रभाकर धात्रक, सरचिटणीस-हेमंत धात्रक,सहचिटणीस-तानाजी जायभावे,विश्वस्त- बाळासाहेब गामणे, डॉ. धर्माजी बोडके, बबनराव सानप, बाळासाहेब चकोर, रामप्रसाद कातकाडे, विठ्ठलराव पालवे, नाशिक प्रतिनिधी- माणिकराव सोनवणे, महेंद्र आव्हाड, प्रकाश घुगे, गोकुळ काकड, दिंडोरी प्रतिनिधी- कचरू आव्हाड, शरद बोडके, भालचंद्र दरगोडे, सिन्नर प्रतिनिधी- हेमंत नाईक. पी.पी. आव्हाड, गणेश घुले, निफाड प्रतिनिधी- रामनाथ नागरे, भगवान सानप, गणपत केदार, येवला- संपत वाघ व दिनेश आव्हाड, नांदगाव प्रतिनिधी- विजय इप्पर व रमेश बोडके, महिला प्रतिनिधी- अरूणा कराड व आक्काबाई सोनवणे.

परिवर्तन पॅनल उमेदवार
अध्यक्ष- पंढरीनाथ थोरे,उपाध्यक्ष-अ‍ॅड.पी.आर.गिते,सरचिटणीस- अभिजीत दिघोळे,सहचिटणीस-मनोज बुरकुले,विश्वस्त-भास्कर सोनवणे, दामोदर मानकर,दिंगबर गिते,बाळासाहेब वाघ,सुभाष कराड,अ‍ॅड.अशोक आव्हाड,नाशिक प्रतिनिधी-मंगेश नागरे,विलास आव्हाड,सुरेश घुगे,विष्णू नागरे, निफाड प्रतिनिधी-अशोक नागरे,अ‍ॅड.सुधाकर कराड, विठोबा फडे, दिंडोरी प्रतिनिधी-दौलत बोडके, शामराव बोडके,भगंवत चकोर,येवला प्रतिनिधी-तुळशीराम विंचू,विजय सानप, नांदगाव प्रतिनिधी-अ‍ॅड.जंयत सानप, विजय बुरकुल, सिन्नर प्रतिनिधी- रामनाथ बोडके,उत्तम बोडके, अशोक भाबड, महिला प्रतिनिधी- अंजनाबाई काकड, शोभा बोडके.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!