भीष्मराज बाम अनंतात विलिन

0

नाशिक । दि. 13 प्रतिनिधी

ज्येष्ठ क्रीडामानसोपचार तज्ज्ञ आणि निवृत्त पोलीस महासंचालक भीष्मराज पुरूषोत्तम बाम यांच्यावर आज सकाळी 11 वाजता पंचवटीतील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

शुक्रवारी सायंकाळी एका व्याख्यानात मार्गदर्शन करताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली होती. मुलगा अभिजित बाम यांनी त्यांना अग्नीडाग दिला.

बाम कुटुबियांसह त्यांनी घडवलेले अनेक खेळाडू व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी सकाळी आठ ते दहा यावेळेत त्यांचेह पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. दरम्यान अमेरिकेत वैज्ञानिक असलेला मुलगा नरेंद्र अंत्यविधीला उपस्थित राहू शकला नाही.

महापौर रंजना भानसी, स्वाध्याय परिवाराच्या तनश्री तळवळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले.

त्यानंतर 11 वाजता पंचवटीतील अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, आमदार जयंत जाधव, विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, माजी उपमहापौर मनिष बस्ते, डॉ. विनायक गोविलकर, शरद आहेर, हरिष बैजल, केशव उपाध्ये, धनंजय बेळे, डॉ. हेमलता पाटील, चाणक्य मंडलचे अविनाश धर्माधिकारी, जितूभाई ठक्कर, आंतराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, ऑलिम्पिकपटू कविता राऊत, डॉ. महेंद्र महाजन, उदय देशपांडे, डॉ. राजू भूजबळ, अभिनेते सुयोग गोरे, क्रीडा प्रशिक्षक विजेंद्रसिंग, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आनंद खरे, अविनाश खैरणार आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रविवारी शोकसभा

भीष्मराज बाम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी शोभसभा आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी 6.30 वाजता महात्मानगर येथील सार्वजनिक वाचनालयात शोकसभा होईल. तसेच रविवार (दि. 21) रोजी दशक्रियाविधीचा कार्यक्रम होणार आहे.

LEAVE A REPLY

*