Type to search

Breaking News कृषिदूत नाशिक मुख्य बातम्या

‘अवकाळी’ ने ९४० हेक्टरवरील पीके बाधित; ५४ गावांना फटका

Share

प्रतिनिधी । नाशिक
अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नूकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने पंचमाने पूर्ण केले असून त्यानूसार जिल्ह्यातील 940 हेक्टर बाधित झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक नूकसान कांदा आणि फळबागांचे झाले आहे. अवकाळीने 54 गावातील बाराशे शेतकर्‍यांना झोपवले आहे. दरम्यान, हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आले आहे.

मागील आठवड्यात जिल्ह्याला अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाका बसला. सिन्नर, निफाड, दिंडोरी, चांदवड, नाशिक या तालुक्यांमध्ये शेतपिकांचे मोठे नूकसान झाले होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने पंचनाम्याचे आदेश न दिल्याने शेतकरी संतप्त झाले होते. पंचनामे करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने शासनाकडून मार्गदर्शन मागवले होते.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतक-यांचा रोष ओढविण्याचे धाडस टाळत शासनाने पंचनाम्याचे आदेश दिले. जिल्हा प्रशासनाने युध्दपातळीवर यंत्रणा हलवत पंचमाने पूर्ण केले असून त्यानूसार 54 गावातील एक हजार 184 शेतकर्‍यांना अवकाळीचा तडाखा बसला आहे. 940 हेक्टरवरील पिके अवकाळीने झोपवली आहे. त्यामध्ये 722 हेक्टरवरील पिके व 218 हेक्टरवरील फळबांगांना फटका बसला आहे.

त्यात सर्वाधिक नूकसान हे कांदा पिकाचे झाल्याचे आकडेवारीवरुन समोर येत आहे. 382 हेक्टर क्षेत्रावरील कांदयाचे नूकसान झाले आहे. तर, 218.59 हेक्टरवरील आंबा, डाळिंब व इतर फळबागा आडव्या झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने हा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. पुढील एक ते दोन आठवड्यात शासनाकडून नूकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक नूकसान भरपाई दिली जाण्याची शक्यता आहे.

पिकनिहाय नूकसान आकडेवारी (हेक्टरमध्ये)
कांदा – 382.90
गहू – 25.20
भाजी-पाला रोपे – 307
लिंबू- 15.34
डाळींब – 171.95
द्राक्ष – 26.20 हेक्टर

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!