Type to search

Breaking News maharashtra नाशिक मुख्य बातम्या

उद्या राज्यभर एकता दौडचे आयोजन

Share

नाशिक : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या गुरुवारी (31 ऑक्टोबर २०१९) राज्यात जिल्हा मुख्यालये, महत्त्वाची शहरे आदी विविध ठिकाणी एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

नाशिकमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून एकतेची शपथ घेऊन दौडचा शुभारंभ होईल. जिल्हाधिकारी सूरज मांढरे एकतेची शपथ देतील. एमजी रोड, रेडक्रॉस सिग्नल, सीबीएसमार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे दौडचा समारोप होणार आहे. एकता दिवसाच्या निमित्ताने देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तसेच नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर आणि नाशिक अशा पाचही जिल्ह्यात राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने एकतेचा संदेश देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात हुतात्मा उद्यान येथून सकाळी 7.30 वाजता दौडचा शुभारंभ होणार आहे.

21 क्रीडा संघटनांनी या दौडमध्ये सहभाग घेतला आहे. अहमदनगर येथे सकाळी 8 वाजता जिल्हा क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून दौडला सुरूवात होईल. टिळकरोडमार्गे आयुर्वेद कॉलेज चौक, रुपीबाई बोरा हायस्कूल मार्ग, दिल्ली गेट, सिद्धीबाग मार्गे पोलीस मुख्यालय येथे एकता दौडचा समारोप होईल. धुळे येथे सकाळी 8 वाजता जमनालाल बजाज मार्गावरील सरदार वल्लभभाई पटेल उद्यान येथून दौडचा प्रारंभ होणार असून महापालिका जुन्या इमारतीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात दौडचा समारोप होणार आहे. जळगाव येथे देखील एकता दौडचे आयोजन करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात येते. यानिमित्ताने आयोजित दौडद्वारे एकतेचा संदेश देण्यात येणार आहे. दौडमध्ये क्रीडा संघटना, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!