Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

केरोसिनधारकांना शंभर रुपयांत मिळणार ‘उज्ज्वला’ गॅस कनेक्शन

Share

नाशिक । प्रतिनिधी
दारिद्य्ररेषेखालील परिवारांना गॅस कनेक्शन मिळावे यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या उज्ज्वला गॅस योजनेत आता राज्य शासनानेही सहभाग घेतला आहे. राज्य शासनाकडून राज्यातील केरोसिनधारकांना शंभर रुपयांत उज्ज्वला गॅसचे कनेक्शन दिले जाणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी गॅस डिलरांकडून रॉकेलचा लाभ घेणार्‍या लाभार्थ्यांची माहिती मागवली आहे. विषेश म्हणजे अवघ्या शंभर रुपयांत हे गॅस कनेक्शन वितरित केले जाणार आहे.

‘स्वच्छ इंधन, बेहतर जीवन’ असा नारा देत केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देशातील दारिद्य्ररेषेखालील 5 कोटी महिलांना मोफत घरगुती एलपीजी गॅस देण्याची योजना अंमलात आणली. या योजनेचा शुभारंभ 1 मे 2016 रोजी केला. ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करताना धुरामुळे डोळ्यांवर व शरीरावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी ही योजना राबवल्यामुळे महिलांचे सक्षमीकरण झाले.

आता केंद्र सरकारकडून उज्ज्वला गॅस योजनेच्या अटी व शर्तींमध्ये बदल करण्यात आला आहे. राज्य शासनानेही या योजनेत सहभाग घेतला आहे. जिल्ह्यात रेशनवर केरोसिन घेणार्‍या परिवारांना उज्ज्वला गॅसचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यात बीपीसी, एचपीसी आणि आयोसी अशा तीन गॅस कंपन्या आहेत.

यात गॅससाठी केवायसी डॉक्युमेंट जवळपास 2 लाख 87 हजार 760 ग्राहकांनी दिले आहेत. त्यात 2 लाख 21 हजार 892 ग्राहकांचे अर्ज पात्र ठरवण्यात आले आहेत, तर 65 हजार 868 अर्ज बाद ठरवण्यात आले आहे. लाभार्थी यादी गॅस डिलर यांना दिली असून त्याप्रमाणे लाभार्थ्यांना संपर्क करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी संबंधित डिलर यांना दिल्या आहेत.

कनेक्शनसाठी डिलरशी संपर्क साधावा
जिल्ह्यात ज्या कुटुंबकडे गॅस नाही त्यांनी तत्काळ संबंधित डिलरकडे संपर्क करून शंभर रुपयांत गॅस मिळवण्यासाठी विहित कागदपत्रांसह अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे. गॅस कनेक्शनसाठी रेशनकार्ड, आधारकार्ड, निवासी पुरावा, बचत खाते पास बुक आवश्यक आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!