Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

‘उबर’ ची DocsApp सोबत पार्टनर्सशिप; २४ तास सेवा मिळणार

Share

नाशिक : उबर, जगातील सर्वात मोठ्या टॅक्सी कंपनीने आता DocsApp सोबत भागीदारी केली आहे. ज्यामुळे, उबर ड्रायव्हर्स ना विनामूल्य डॉक्टरी कन्सल्ट, कमी दरात औषधे आणि लॅब टेस्ट या सुविधा पुरवल्या जातील. या सुविधा संपूर्ण ‘उबर ड्राइवर’ आणि ‘उबर इट’ या दोन्ही विभागांना लागू आहे.‘उबर पार्टनर्स’ आणि त्यांच्या कुटुंबातील ५ जणांनाही सुविधा पुरवली जाईल.

‘उबर इंडिया’ आणि DocsApp हे एकत्र येऊन उबर पार्टनर्सला परवडतील अशी वैद्यकीय सुविधा देत आहे. यामध्ये उबर पार्टनर्स यांना हवे तेवढे मोफत वैद्यकीय कंसल्टस दिले जातील व औषधांवर २०% पर्यंत तर लॅब टेस्ट वर ४०% पर्यंत सूट देण्यात येईल. या भागीदारीबद्दल बोलताना DocsApp चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सतीश कानन म्हणाले की, “कोणत्याही अडथळ्याशिवाय उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सर्वांना उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. या भागीदारीमुळे आम्हाला आमचे ध्येय साध्य करण्यास मदत होईल.”

भारतामधील ५०.००० हुन अधिक ‘उबर ड्रायव्हर्स’ आता ऑनलाइन डॉक्टरी कन्सल्ट देणाऱ्या प्लॅटफॉर्मवरती नोंदले गेले आहेत. तसेच ड्रायव्हर्सना मेसेज सुद्धा पाठवला जाईल आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र ग्राहक सेवा नंबर DocsApp द्वारे पुरवला गेला आहे.

DocsApp बद्दल:

DocsApp हे २४ तास ऑनलाइन डॉक्टरी सल्ला देणारे ऍप आहे. चॅट, कॉल आणि विडिओ कॉल याद्वारे रुग्णांशी संपर्क केला जातो. मोबाइल आणि वेबसाईट या दोन्ही माध्यमांमधून डॉक्टरी कन्सल्ट दिले जातात. आय.आय. टी. (IIT) चे माजी विद्यार्थी असणारे श्री. सतीश कनन आणि एन्बासेकर दिनदयालाने यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सर्व देशभरात पुरवली आहे.

उबर बद्दल:

नवीन संधी निर्माण करणे हे उबरचे ध्येय आहे. आम्ही २०१० मध्ये एका समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रारंभ केला आणि ते म्हणजे ‘प्रवास करणे केवळ हातांच्या बोटावर आणून ठेवणे.’ १० अब्जहून अधिक वाहन सुविधा देऊन, लोकांना पाहिजे असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही साधने तयार करीत आहोत. शहरांतून प्रवास करणे आणि खाद्य पदार्थ घरपोच मिळवणे हे उबर मुळे अगदी सोपे झाले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!