Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

देवळा तालुक्यात एकाच दिवशी दोन आत्महत्या

Share

देवळा : तालुक्यातील गुंजाळनगर येथील कल्पेश भाऊसाहेब गुंजाळ (१८) या अकरावीत शिकणाऱ्या युवकाने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर माळवाडी येथील विजया जिभाऊ बागुल (३०) या विवाहितेने गिरणा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. एकाच दिवशी झालेल्या या आत्महत्यांमुळे देवळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गुंजाळनगर येथील पानसेवाडी शिवारातील कल्पेश भाऊसाहेब गुंजाळ या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आज (दि. १३) रोजी दुपारी १ ते २ वाजेच्या दरम्यान स्वतःच्या घरी साडीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीसपाटील योगेश गुंजाळ यांनी या बाबत पोलिसांना खबर दिली.

तसेच माळवाडी येथील विवाहिता विजया बागुल हिने लोहोनेर येथील ब्रिटिश कालीन पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या आत्महत्या सत्रा मुळे तालुक्यात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनांचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश निकम व त्यांचे सहकारी करीत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!