Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

शहरात एकाच दिवशी दोन आत्महत्या

Share
शहरात दोघांच्या आत्महत्या latest-news-news-two-suicides-in-city

नाशिक । शहरात आज दोन आत्महत्या झाल्या असून यामध्ये एकाने दारूच्या नशेत तर एकाने गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची घटना घडल्या आहेत.

अधिक माहिती अशी कि, सोमवारी (दि. ११ ) रोजी दुपारी दारूच्या नशेत एकाने गोदापात्रात उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना रामवाडी पूल परिसरात घडली. दत्तू अशोक पवार (36 रा.वाघ चाळ,गंगावाडी) असे आत्महत्या करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे. दत्तू पवार याने सोमवारी अज्ञात कारणातून मद्याच्या नशेत रामवाडी पुलावरून गोदावरी नदी पात्रात उडी घेतली होती.

ही बाब लक्षात येताच अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ धाव घेत त्यास पाण्याबाहेर काढले असता उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. मद्यपीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार खान करीत आहेत.

तर दुसरी घटना अशी कि, राहत्या घरात 25 वर्षीय युवकाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.11) रात्री पेठरोड भागातील अश्वमेधनगर भागात घडली. अविनाश सुभाष जगताप (25 रा.मनपा शाळेसमोर,अश्वमेधनगर) असे आत्महत्या करणार्‍या युवकाचे नाव आहे.

अविनाश जगताप याने सोमवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये छताच्या अ‍ॅगलला ओढणी बांधून गळफास लावून घेतला. त्यात त्याचा मृत्यू झाला. तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास जमादार शेळके करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!