Type to search

नाशिक

संगमनेर नजीक अपघातात नाशिकचे दोघे ठार

Share

संगमनेर प्रतिनिधी : नाशिकहून पुणे येथे जाणार्‍या स्वीप्ट डिझायर कार व मालट्रक यांच्यात झालेल्या धडकेत कारमधील दोघे जण जागीच ठार झाले आहे तर चार गंभीर जखमी झाले आहे. ही घटना नाशिक-पुणे महामार्गावर अकोले बायपास मालपाणी स्केअरजवळ आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुषण दिलीप वाळेकर (वय 28, कार चालक), आर्यन जयंत सांत्रस (वय 14) दोघे रा. नाशिक अशी मयतांची नावे आहे. जयंत शामसुंदर सांत्रस (वय 48), मोहिनी जयंत सांत्रस (वय 42), उषा शरद लोहारकर (वय 60), देवयानी भुषण वाळेकर (वय 23, सर्व रा. नाशिक) व वरील दोघे असे सहा जण स्वीप्ट कार क्रमांर एम. एच. 15 ओ. एस. 7655 मधून हे सर्व जण जयंत सांत्रस यांच्या पुणे येथील भाचीच्या लग्नासाठी नाशिकहून पुण्याकडे चालले होते. सकाळी 8 वाजेच्या सुमारास मालट्रक क्रमांक जी. जे. 06 वाय 8386 हा नाशिककडून पुणेकडे जात असतांना अकोले बायपास जवळ मालपाणी स्केअर जवळ यु टर्न घेत असतांना पाठीमागून स्वीप्ट कार क्रमांक एम. एच. 15 डी. एस. 7655 हिने पाठीमागून ट्रकला धडक दिली.

झालेल्या अपघातात भुषण वाळेकर व आर्यन सांत्रस हे ठार झाले असून चार गंभीर जखमी झाले आहे. त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खंडीझोड, पोलीस नाईक सचिन उगले यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

याबाबत शहर पोलीस ठाण्यात जयंत शामसुंदर सात्रस यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी मालट्रक चालक मोहमंद बिलाल मेहबुब मलिक (रा. ढोईसर, ता. आनंद, राज्य गुजरात) याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 31/2019 भारतीय दंड संहिता 304 (अ), 279, 337, 338, 427, मोटार वाहन कायदा कलम 184, 134, अ, ब प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत करत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!