Type to search

Breaking News टेक्नोदूत नाशिक मुख्य बातम्या

मराठी कलाकारांकडून #पुन्हानिवडणूक हॅशटॅग ट्रेंड; सोशल मीडियात वाद

Share

नाशिक : सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसतांना आता मराठी कलाकारांनी वाद ओढवून घेतला आहे. अनेक मराठी कलाकारांनी #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग चा वापर करीत ट्विट केले आहे. यामुळे सोशल मीडियावर चांगलाच वाद रंगला आहे.

दरम्यान राज्यात सत्ता स्थापन न झाल्याने राष्ट्रपती राजवट सुरु आहे. त्यातच महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. परंतु अचानक आज सकाळपासून ट्विटरवर #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग ट्रेंडिंग होत असल्याने मराठी कलाकारांवर खापर फोडले जात आहे.

यामध्ये सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी यांच्यासह अनेक कलाकारांनी यासारखे ट्विट केले आहे. त्यामुळे यातून काय निर्देश करावयाचा हे अद्याप स्पष्ट झालेलले नाही. तर दुसरीकडे अमेय तिरोडकर याने लिहिले आहे कि, समीर विद्वंस यांचा ‘धुरळा’ सिनेमा येत असून #पुन्हानिवडणूक हा त्याचा ट्रेंड आहे. तो सिनेमा जानेवारीमध्ये प्रदर्शित होईल. पंरतु अद्याप कलाकारांनी याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!