Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : एटीएम फोडणाऱ्या टोळीला बारा तासांत अटक

Share

नाशिक : सिन्नर येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांना सिन्नर पोलिसांनी अवघ्या बारा तासांत जेरबंद केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शुक्रवारी (दि. २०) रोजी सिन्नर येथील सांगळे कॉम्प्लेच्या गाळ्यात असणाऱ्या एसबीआयचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी सिन्नर पोलीस स्थान्यात माहिती मिळाल्यानंतर पथक तयार करत तपासाला गती दिली.

यावेळी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरटे घोटी रोडवरील बंधन लॉन्स परिसरात असल्याचे समजले. त्याप्रमाणे सापळा रचून पोलिसांनी ओकांर साबळे (सिन्नर), आकाश खलसे (रा. सिन्नर) यांना ताब्यात घेतले.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सापळा रचून अमोल बोराडे ( रा. वाडीवऱ्हे), अशोक जाधव (रा. म्हसुर्ली) यांना ताब्यात घेण्यात आले. तर पाचवा संशयित नागेश वाव्हळ (३०) यास पांडवनागरी, सिन्नर येथून अटक करण्यात आली. दरम्यान अक्षय निवृत्ती जाधव (रा. म्हसुर्ली) हा फरार असून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!