Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

तंत्रशिक्षणाच्या दरवर्षी 25 हजार जागा घटल्या

Share

नाशिक। प्रतिनिधी
सार्वजनिक व खासगी क्षेत्रात नोकरीच्या अत्यल्प संधी उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दरवर्षी सुमारे 25 हजार तर सन 2015-16 ते 2019-20 या चार वर्षांत राज्यातील तंत्रशिक्षणाच्या तब्बल 1 लाख 1 हजार 574 जागा घटल्या आहेत.

एआयसीटीई अर्थात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर शैक्षणिक वर्ष 2019-20 साठीच्या मान्यताप्राप्त संस्था, प्रवेश क्षमता आदीचा तपशील उपलब्ध करून दिला आहे. या तपशिलानुसार लाखो जागा घटल्याचे स्पष्ट होत आहे.

शैक्षणिक वर्ष 2015-16 मध्ये देशभरातील 10 हजार 329 संस्थांमध्ये 38 लाख 36 हजार 181 जागा उपलब्ध होत्या, तर 2019-20 साठी 10 हजार 778 संस्थांमध्ये मिळून 32 लाख 52 हजार 821 जागा उपलब्ध आहेत. याचाच अर्थ 5 लाख 83 हजार 360 जागा कमी झाल्या. कमी झालेल्या जागांमध्ये महाराष्ट्रातून 1 लाख 1 हजार 574 जागा कमी झाल्या आहेत.

2012-13 ते 2019-20 या सात वर्षांत सर्वाधिक जागा 2015-16 या वर्षी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर मात्र जागा मोठ़या प्रमाणात कमी होण्यास सुरुवात झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 20 हजार 85 जागा कमी झाल्या आहेत. कमी झालेल्या जागांची माहिती केवळ एआयसीटीईची मान्यता असलेल्या संस्थांशी संबंधित आहे.

त्यात देशातील आयआयटी, एनआयटी अशा केंद्रीय संस्था, अभिमत विद्यापीठे आणि काही विद्यापीठांतील अभ्यासक्रमांच्या जागांची माहिती समाविष्ट नाही. काही वर्षांत विद्यार्थ्यांचा तंत्रशिक्षणाकडे असलेला ओढा कमी झाल्याने या रिक्त जागांचा आकडा फुगला आहे. त्यातही अभियांत्रिकीकडे असलेला कलही घटत चालल्याचे दिसते आहे.

पूर्वी देशात थोडक्याच आयआयटी, एनआयटीची संख्या मर्यादित होती. मात्र, अलीकडे या संस्थांची संख्या वाढल्याने विद्यार्थी तिकडे प्रवेश घेऊ लागले. त्याचा फटका खासगी संस्थांना बसला. त्यामुळे रिक्त जागांची संख्या वाढतच चालली आहे.

146 अभ्यासक्रमांना ब्रेक
येत्या शैक्षणिक वर्षांसाठी राज्यातील 146 अभ्यासक्रम बंद झाले आहेत. अभ्यासक्रम बंद करण्यासाठी संस्थांच्या प्रस्तावाला एआयसीटीईने ‘प्रोग्रेसिव्ह क्लोजर’ पद्धतीने मान्यता दिली आहे. म्हणजेच संबंधित संस्थांना त्या अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षांसाठी प्रवेश देता येणार नाहीत.

राज्यातील संस्था आणि प्रवेश क्षमतेची स्थिती

2019-20

एकूण संस्था 1 हजार 556

प्रवेश क्षमता 3 लाख 80 हजार 99

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!