त्र्यंबकसाठी ईदगाद मैदानावरून 275 बसेस सुटणार

0

नाशिक । तिसर्‍या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. सोमवारी (दि.26) सकाळी 6 ते मंगळवारी (दि.27) यात्रा संपेपर्यंत भाविकांच्या सोयीसाठी त्र्यंबकरोडवरील ईदगाह मैदान येथून 275 जादा बसेस सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी दिली.

मैंद म्हणाले, राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने त्र्यंबकेश्वरला जाणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी जय्यत तयारी केली आहे. मेळा बसस्थानकात एअरपोर्टच्या धर्तीवर राज्यातील सर्वात मोठे बसपोर्ट उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मेळा बसस्थानक वाहतुकीसाठी बंद आहे. जुने सीबीएसवरून वाहतूक अशक्य असल्याने ईदगाह मैदान प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. तिसर्‍या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला जाणार्‍या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी त्र्यंबकरोडवरील ईदगाह मैदान येथून 275 जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक क्र. 2 आगारामार्फत शिवाजी चौक, विजयनगर, पवननगर, त्रिमूर्ती चौकमार्गे तीन फेर्‍या प्रायोगिक स्वरुपात त्र्यंबकेश्वरकरिता चालवण्यात येणार आहेत.

जाण्या-येण्याचा मार्ग
एसटी बसेस राजदूत हॉटेलजवळील फाटकातून बाहेर पडून त्र्यंबकरोडने जलतरण तलाव सिग्नल, भवानी सर्कल या मार्गाने त्र्यंबकरोडकडे जाणार आहेत. त्र्यंबकेश्वरकडून येणार्‍या बसेस भवानी सर्कल येथे उजव्या बाजूला वळून चांडक सर्कल येथून ईदगाह मैदानाच्या मागील बाजूच्या प्रवेशद्वाराने आत जाणार आहेत, असे विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*