त्र्यंबक तालुक्यात दुष्काळ असताना वॉटरपार्कसाठी अंजनेरीतून १० टक्के पाणी

0

ञ्यंबकेश्वर | विशेष प्रतिनिधी : सर्वत्र दुष्काळाच्या झळा जाणवत असतांना नाशिक ञ्यंबक रस्त्यावरील वाढोली शिवारात असलेल्या वॉटरपार्क साठी संबंधीत शासन यंत्रणेने अंजनेरी धरणातून 10 टक्के पाणी आरक्षणाची परवानगी दिल्याने ग्रामस्थांनी तिव्र विरोध केला आहे।याबाबत नुकतेच अंजनेरी येथे ग्रामस्थांची बैठक झाली व त्यामध्ये अंजनेरी धरणाचे पाणी कोणत्याही परिस्थितीत वॉटर पार्क करिता दिले जाणार नाही असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

तालुक्याच्या पूर्व भागात एकमेव अंजनेरी धरण शेती सह पिण्याच्या पाण्यासाठी असताना राजकीय वजन वापरून स्वतः च्या  शुभम वाटर पार्कच्या खाजगी व्यवसायासाठी धरणातील १० टक्के पाणी आरक्षित करण्याची परवानगी आणली गेल्याची माहिती मिळताच या भागातील शेकडो शेतकऱ्यांनी अंजनेरी येथे बैठक घेत या परवानगीस विरोध दर्शविला आहे.बैठकीत खाजगी व्यवसायास  पाणी देण्यास  तीव्र विरोध करत हक्काचे पाणी न देण्याचा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी केला.यावेळी ज्येष्ठ नेते मधुकर लांडे, सरपंच राजू बदादे, गोविंद चव्हाण, राजाराम चव्हाण, धोंडीराम चव्हाण, नामदेव चव्हाण,गणेश चव्हाण, चंदू चव्हाण, अंबादास चव्हाण, कचरू निंबेकर, अशोक चव्हाण, मुरलीधर महाले, दिलीप शिंदे, निवृत्ती चव्हाण आदि उपस्थित होते.

पाच वर्ष पूर्वीच येथील धरणावर शेतकऱ्यांची पाणी वापर सोसायटी सुरू झाली असून त्यानंतर एकाही नवीन शेतकऱ्यांना पाणी उचलण्यासाठी परवानगी दिली जात नसताना खाजगी व्यवसायास १० टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात परवानगी दिली गेल्याने शेतकऱ्यांनी यावेळी संताप व्यक्त करत या विरोधात लढा उभारण्याचा निर्धार केला.तर विरोध म्हणुन येत्या २६ जानेवारीस या  भागातील सर्व ग्रामपंचायतींचा ठराव करून पाणी बचाव संघर्ष समितीमार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे.

तालुक्यातील  सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी धरणाच्या पाण्यासंदर्भात किती गंभीर आहेत हे निदर्शनास येते. यासाठी आता लोकप्रतिनिधी, नागरिकांनी एकत्र यावे व हक्काचे पाणी आरक्षित करणायास विरोध करावा असे व्यक्त होत  आहे. राजकीय पक्षभेद बाजूला सारुन भविष्याची चिंता ओळखून सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*