Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video | त्र्यंबकेश्वर : नांदगाव कोहळी येथे पिण्यासाठी गाळयुक्त पाण्याचा वापर

Share

नांदगाव कोहळी | सनिल पगारे : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच आहे. जूनचा पहिला आठवडा संपला तरी अजूनही पावसाचे आगमन झालेले नाही. त्र्यंबक तालुक्यतील नांदगाव कोहळी या दुर्गम भागात आजही पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र दिसून आले.

दरम्यान त्र्यंबकेश्वर पासून २८ किमी अंतरावर असलेल्या नांदगाव कोहलीची हि कथा. आजही जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस झाला असला तरी हे गाव पाण्यासाठी आसुलेले दिसून येत आहे.

अवघे बाराशे लोकवस्तीचे हे गाव असून गावात उन्हाळा संपला तरी एकही टँकर फिरकला नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. रात्री अपरात्री लहान मुलांना टाकून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. स्थानिक प्रशासनाने अद्याप एकही टँकरची सुविधा उपलब्ध करून दिली नाही.

सध्या ग्रामस्थ गावापासून दोन तीन किमी असलेल्या विहरीतून गाळयुक्त पाणी पिण्यासाठी वापरात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी सरपंच मंगळू दिवे, तुकाराम गवळी (ग्रा. सदस्य), उत्तम लिलके , कमळाबाई अंबापुरे, हिराबाई अंबापुरे, सुकाबाई उदार, देवकाबाई महाले, रामचंद्र ताठे, रत्ना पगारे, करुणा ताठे, दीक्षा ताठे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!