त्र्यंबकेश्वर : तोरंगण घाटात खाजगी बस दरीत कोसळून सहा ठार

0

त्र्यंबकेश्वर : जव्हार कडे जाणारी खाजगी बस तोरंगण घाटात कोसळल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दरम्यान ३० ते ३५ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

शिर्डीवरून देव दर्शन करून गुजरातकडे जात असताना हा अपघात घडला. अपघातातील सर्व भाविक सुरत शहरातील जग्गानाका पलमारिया येथील आहेत.  ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तोरंगण घाटातील भांग्यादेव या ठिकाणी हा अपघात झाला. यावेळी बस थेट ३० फूट खोल दरीत कोसळली.

सदर भाविक तीन दिवसाच्या तिर्थयात्रेसाठी आले होते. शनिवारी सापुतारा मार्गे शिर्डीला गेले होते. आज शिर्डी येथुन नाशिक व त्र्यंबक येथे दर्शन घेऊन दुपारी जव्हार येथील महाल्क्षमी देवीच्या दर्शनाला निघाले होते.

यावेळी स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य करीत जखमींना रुग्णालयात हलविले. अपघातात अनेक भाविक गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान जखमींना मोखाडा, उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबकेश्वर व नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत आहे. त्यासाठी १०८ च्या नऊ रुग्णवाहिका बचावकार्यासाठी धावत आहेत.

 

LEAVE A REPLY

*