Type to search

Video | त्र्यंबकेश्वर : खालसा ऍड संस्थेकडून महिनाभरापासून पाणी वाटप; अभिनेता रणदीप हुड्डाची उपस्थिती

Breaking News maharashtra नाशिक मुख्य बातम्या

Video | त्र्यंबकेश्वर : खालसा ऍड संस्थेकडून महिनाभरापासून पाणी वाटप; अभिनेता रणदीप हुड्डाची उपस्थिती

Share

नाशिक : गेल्या दोन महिन्यापासून दुष्काळाचे भयानक चित्र जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाहावयास मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र दुष्काळाने जिल्ह्यातील जनतेचा घसा कोरडा केला असून या पार्श्‍वभुमीवर तालुक्यात खालसा एड या संस्थेच्या माध्यमातून नागरीकांची तहान भागविली जात आहे.

दरम्यान या निमित्ताने अभिनेता रणदीप हुड्डा या उपक्रमात सहभागी झाला असून आज (दि. ०९) त्र्यंबकेश्वर तालुक्यताही वेळे या गावात या संस्थेतर्फे वॉटर टँकर पुरविण्यात आला . त्यावेळी तो उपस्थित होता. उपस्थित राहून रणदीप हुड्डाने एका व्हिडिओद्वारे शासनाला या गावासंबंधी दुष्काळाची माहिती दिली असून शासनाने या गावासाठी टँकर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली आहे.

खालसा एड या संस्थेच्या माध्यमातून त्रंबक तालुक्यातील हिरडी, वेळे, परिसरातील इतर १२ गावांना गेल्या महिनाभरापासून टँकरद्वारे पाणी पुरवण्याचे काम चालू आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात दुष्काळाची झळ बसली आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई भासू लागली आहे. अनेक गावांमध्ये पाणी पुरवठ्याच्या कोणत्याही योजना नसल्याने गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे.

या संस्थेने महिलांच्या डोक्यावरील हंडा कमरेवर आणण्याचे महत कार्य हाती घेतले आहे. दरम्यान पाणी टंचाईच्या झळा दिवसेंदिवस अधिकच गडद होऊ लागल्या आहेत. तालुक्यातील जनतेचा घसा कोरडा होत असून त्यांना खालसा एड या संस्थेचा मोठा आधार वाटू लागला आहे. तसेच संस्थेच्या माध्यमातून नैसर्गिक पाणी साठा करण्यासाठी गावकर्‍यांना टँकर देण्यात आले आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!