Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

PhotoGallery/Video : अवघे त्र्यंबकेश्वर जलमय; शहरात पूरपरिस्थिती

Share

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाची संततधार सुरूच आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी कोसळधार सुरु असून अनेक नद्यांना पूर आला आहे. दरम्यान त्र्यंबकेश्वर येथे जोरदार पावसामुळे अवघे शहर जलमय झाले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

त्र्यंबकेश्वर येथे शुक्रवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्याने अवघे शहर जलमय झाले. दरम्यान नाशिक शहरातही काळ दुपारापासून सुरु झालेला पाऊस अजूनही सुरूच असल्याने गोदावरीला पूर आला आहे. यामुळे दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणी लागले आहे. रात्री एक वाजेपासून शहरातील सिडको, पंचवटी, सातपूर, इंदिरानगर, नाशिकरोड परिसरांत पावसाचा जोर कायम असून रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते.

त्र्यंबकेश्वर येथील अनेकभागात पाणी शिरले असून मंदिराजवळील परिसरात पाणी साचल्याने पर्यटकांचे हाल झाले आहेत. कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

अवघे त्र्यंबकेश्वर जलमय; गोदावरीला पूर

अवघे त्र्यंबकेश्वर जलमय; गोदावरीला पूर नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाची संततधार सुरूच आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी कोसळधार सुरु असून अनेक नद्यांना पूर आला आहे. दरम्यान त्र्यंबकेश्वर येथे जोरदार पावसामुळे अवघे शहर जलमय झाले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Deshdoot यांनी वर पोस्ट केले शनिवार, ६ जुलै, २०१९

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!