त्रंबकेश्वर पंचायत समितीचा जागेचा प्रश्न लवकर मार्गी लावणार : आ. गावित

0
dav

वेळुंजे(त्र्यं) वार्ताहर : त्रंबक तालुक्याच्या निर्मितीनंतर आज मोठ्या प्रमाणावर गावे जोडली गेली आहेत अनेक गावे ही दळवळणाच्या निमित्ताने त्रंबकेश्वर येथे येत असतात. लोकांना दळण-वळण सुविधा तात्काळ मिळाव्या यासाठी तालुका निर्मिती करण्यात आली.

त्र्यंबकेश्वर तालुका आदिवासी बहुल तालुका आहे, यात जवळजवळ १२४ गावे आहेत. अतिशय विखुरलेल्या हा तालुका असताना त्र्यंबकेश्वर पंचायत समिती जागे अभावी त्र्यंबकेश्वर पासून ६ किलोमीटर अंतरावर अंजेनरी येथे उभारण्याचा ठराव पंचायत समिती स्तरावर करण्यात आला होता, परंतु आज तालुक्याच्या आमदार निर्मला गावित यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती.

यावेळी आमदार गावित, त्र्यंबक नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार, जेष्ठ नेते संपत सकाळे, पंचायत समिती सभापती ज्योती राऊत, उपसभापती रवींद्र भोये, शिवसेना संघटक समाधान बोडके, यांच्या प्रमुख उपस्थितीत त्र्यंबकेश्वर पंचायत समितीच्या जागे संदर्भात विषे चर्चा झाली.

यावेळी अनेकांनी दाखले देत त्रंबकेश्वर पंचायत समिती कशाप्रकारे या ठिकाणी महत्वाचॆ आहे, तसेच तालुका किती विखुरलेल्या आहे, पंचायत समितीचा आराखडा, व त्यासाठी पर्यायी जागा ही आरक्षित ठेवावी याबाबत काहींनी मत व्यक्त केले.

पंचायत समिती ग्रामीण भागातील जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी तहसील कार्यालयाजवळ आलेली जागेचा पर्याय दिला आहे, बाकी जागा पंचायतिची असल्याने काही जागेचाच प्रश्न आहे, त्यामुळे नगरपरिषद अनुकूल आहे असे सांगितले. यानंतर आमदार गाविताना यावर तोडगा काढत पंचायत समिती ही त्र्यंबकेश्वरलाच होणार, ज्या काही तांत्रिक बाबी असतील त्या आपण सर्व पक्षीय बसून करू, खासदार तसेच पालकमंत्र्याची देखील याबाबत भेट घेऊ तसेच आमदारांनी जागेची पाहणी करून हे कार्यालय त्र्यंबकेश्वर मधेच राहील असे आश्वासनही दिले.

LEAVE A REPLY

*