‘रस्ते विथ खड्डे’चा पुन्हा प्रत्यय; त्र्यंबकेश्वर येथे दुचाकीस्वार खड्ड्यात पडून जखमी

0
dav

वेळुंजे(त्र्यं)। त्र्यंबकेश्वर- जव्हार रस्त्याला शिरसगाव (त्र्यं) जवळ रस्त्याला एक मोठा खड्डा पडला आहे, यामुळे अपघात होऊन दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे निकृष्ठ दर्जाचे काम पुन्हा एकदा उघड झाले आहे.

मागील वर्षीच या रस्त्याची डागडुजी करून मलमपट्टी करण्यात आली होती. हा रस्ता नाशिक ते जव्हार, पुढे पालघर ला जाऊन मिळत असतो. पुढे चारोटी नाका गुजरात हायवे ला जोडला आहे. रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु याच रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डडे पडले आहे. त्यामुळे वाहन धारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून अनेक वेळा अपघातही होत असतात.

शिरसगाव त्र्यं) येथील हॉटेल यशवंतजवळ रस्त्याला मोठा खड्डा पडला असून दररोज दुचाकीस्वाराचा अपघात होत आहे. दिवसा हा खडा डोळ्यांना दिसतो पण रात्रीची वेळी हा खड्डा दिसत नसल्याने दुचाकीस्वार या खड्यात आपटून जखमी होत आहे.
सोमवारी झालेल्या अपघातात देवरगाव येथील लक्षण वाळू पिंपळके, वय २५ व तुकाराम वाळू पिंपळके या मोटरसायकल नं mh15. FR 1867 ही गाडी खड्यात आदळल्याने दोघही या खड्ड्यात पडून जबर जखमी झाले आहे, सामाजिक कार्यकर्ते महेश मेढे यांनी तात्काळ १०२ ला फोन करून रुग्णवाहिका चालक दीपक मींदे च्या सहकार्याने त्यांना त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले व तिथून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
बांधकाम विभागाने या कडे लक्ष देऊन हे काम पूर्ण करण्याची तसेच मृत्यूच्या या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावे अशी संतप्त मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*