ञ्यंबकेश्वर येथे दिड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन

0

ञ्यंबकेश्वर विशेष प्रतिनिधी : ञ्यंबकेश्वर येथे आज दिड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. भाजपा शहराध्यक्ष व नगरसेवक शामराव गंगापुत्र आणि परिवाराच्या गणेश मूर्ती तलावात विसर्जित न करता मूर्तीदान करण्यात आल्या.

येथील गौतम तलावावर ग्रामस्थांनी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान गणेश विसर्जनकेले. भाजपा शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र यांच्या श्री गणेशाच्या विसर्जनासाठी स्वामी सागरानंद सरस्वती वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी भजन अभंग म्हणत गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आले होते.

शामराव गंगापुत्र आणि गंगापुत्र परिवाराच्या गणपतींचे विसर्जन कुटुंबीयांनी आरती करून व त्यानंतर बाटल्यांच्या होडीतून तलावात मूर्ती- फिरविण्यात आल्या व त्यानंतर नगर पालिकेच्या वतीने मूर्ती संकलित करण्यात येतात, तेथे दान करण्यात आल्या.

यावेळेस दिलीप गंगापुत्र ,युवराज गंगापुत्र, रोहित गंगापुत्र, भूषण गंगापुत्र याचवेळेस येथे ग्रामस्थांनी देखील गणेश विसर्जन केले. यावेळेस आरोग्य निरीक्षक शाम गोसावी, किशोर मैडा आदि उपस्थित होते. नगर पालिकेने येथे स्वच्छता ठेवण्यात आली होती.

LEAVE A REPLY

*