Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video | त्र्यंबकेश्वर : खरवळ येथील नागरिक अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत

Share

त्र्यंबकेश्वर :  पावसाळा सुरु झाला असला तरी पावसाचे आगमन काही झाले नसून ऐन पावसाळ्यात देखील राज्यातील जनतेला दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. त्र्यंबक तालुक्यतील खरवळ या दुर्गम भागात आजही पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र दिसून आले. पिण्यासाठी ग्रामस्थ दोन तीन किमी पायपीट करताना दिसत आहे.

दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच आहे. जूनचा पहिला आठवडा संपला तरी अजूनही पावसाचे आगमन झालेले नाही. दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेले खरवळ हे गाव देखील दुष्काळाने होरपळून निघाले आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यात काही ठिकाणी आगमन केले असले तरी या भागात अजूनही पाऊस नसल्याने नागरिक पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

पाऊस अजून झाला नसला तरी शेतकऱ्यांनी मशागत करून आशा सोडली नाही. तसेच टँकर देण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

  • सनील पगारे
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!