Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video। देशदूत इम्पॅक्ट : तहानलेल्या नांदगाव कोहळीला मिळाला टँकर; ग्रामस्थांनी मानले देशदूतचे आभार

Share

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर : तालुक्यातीलनांदगाव कोहळी ग्रुप ग्रामपंचायत येथे गाळ युक्त पाण्याचा वापर पिण्यासाठी नागरिक करीत होते. याबाबत काल (दि. ११ ) रोजी देशदूतने वृत्त प्रसिद्ध केले होते.

दरम्यान बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती घेत तात्काळ नांदगाव कोहळी साठी एक टँकर मंजूर करीत आज नागरिकांना पुरेसे पाणी दिल्याची माहिती प्रतिनिधीने दिली आहे.

नांदगाव कोहळी येथील नागरिक गेल्या दोन महिन्यापासून दुष्काळाशी सामना करीत आहेत. नागरिकांना गढूळ व दूषित पाणी प्यावे लागत होते. यामुळे महिलांसहित पुरुष देखील पाण्यासाठी वणवण करत होते. दरम्यान, देशदूतने गावातील दुष्काळी परिस्थितीबाबत आढावा घेत येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेत वृत्त प्रसिद्ध केले.

मागील बातमी वाचण्यासाठी इथे क्लीक करा …

https://www.deshdoot.com/nashik-trimbakeshwar-use-of-sludge-water-for-drinking-water-at-nandgaon-kohli/

त्यामुळे आज तात्काळ बातमीची दखल प्रशासनाने टँकरची व्यवस्था केली. याबाबत नागरिकांनी देशदूतचे आभार मानले आहे. यावेळी उत्तम लिलके ,हेमराज कोहरे, दत्तु गवळी, जगदिश फसाळे, लकांबाई गवळी, सत्यभामा भोये, हिराबाई कोहरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!