त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाची अंजनेरीच्या नाणेपंढरीला शैक्षणिक भेट

0

त्रंबकेश्वर : रोजच्या जगण्याच्या लढाईत आपल्याला पैशाच्या मागे धावावं लागतं,असं असलं तरी प्रत्यक्षात या पैशांचा, नाण्यांचा उगम कसा झाला या विषयाचा इतिहास मांडणारं एक अप्रतिम संग्रहालय नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर अंजनेरी या गावी आहे हे अनेकांच्या गावीही नाही!

त्र्यंबकेश्वर येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ वेदश्री थिगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र आणि वाणिज्य विभागाचे प्रा सुलक्षणा कोळी व प्रा प्रवीण गोळे यांनी अर्थशास्त्राचे 47 विद्यार्थी घेऊन शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन न्यूमिस्मटिक स्टडीज म्हणजेच भारतीय नाणेशोध संस्थान,भारतातीलच नव्हे तर जगातील नाणेप्रेमींची पंढरी!आपण जे चालन वापरतो त्यांचा साक्षात इतिहास या ठिकाणी जतन करून ठेवलेला आहे .आपला इतिहास,संस्कृती गत आस्तित्वाच्या खाणाखुणा पकडून ठेवणारे ठिकाण म्हणजे हे संग्रहालय.

जनसामान्यांपर्यंत चलनाचा इतिहास पोचविण्याचे कार्य हे संग्रहालय अविरतपणे करीत आहे.सोने, चांदीची मौल्यवान नाणी संस्थेच्या तिजोरीत सुरक्षित आहेत. त्यांच्या हुबेहूब प्रतिकृती प्रदर्शनात ठेवल्या आहेत. भरपूर माहितीपूर्ण छायाचित्रे, तक्ते, नकाशे यांनी परिपूर्ण असे हे संग्रहालय संशोधकांना संशोधनासाठी खुणावते आहे.

केवळ नाणीच नव्हे तर नाणीरुप चलनापूर्वीचा वस्तुविनिमय, धातुविनिमय, कवडी इ.चलन पद्धतीपासून ते एटीएम पर्यंतचा चलनप्रवास हे संग्रहालय आपल्यासमोर साकारते. तसेच संशोधकांसाठी संस्थेने नाणीविषयक काही मौल्यवान पुस्तकेही इथे उपलब्ध करून दिली आहेत. आमच्या विद्यार्थ्यानी या केंद्रातील अमूल्य माहितीचा मनमुराद आनंद लुटला, इथल्या मार्गदर्शकांनी सुंदर मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

*