Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

ब्रम्हगिरीची फेरी सायकलवर यशस्वीपणे पुर्ण

Share

नाशिक : सध्याच्या काळात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. सोबतच शहराचे प्रदूषण, तापमान वाढत आहे. याशिवाय वर्दळ आणि पार्किंगचाही त्रास सर्वसामान्यांना सोसावा लागतो. या सर्वांवर मात करत चामरलेणी सायकलिंगच्या १० सायक्लिस्टने अतिशय अवघड अशी ब्रम्हगिरीची फेरी सायकलवर यशस्वीपणे पुर्ण केली.

जागतिक सायकल दिवसाच्या निमित्ताने सर्वात अवघड अशा ब्रम्हगिरीला सायकलीच्या माध्यमातून प्रदक्षिणा घालण्यात आली. यामध्ये प्रविण कोकाटे,सुभाष दराडे,अरुण निकम,कीसन काकड,सोमेश्वर मुळाणे,लोखंडे सर,राहुल गायकवाड,घुमरे सर,नितीन गायकवाड,कु.सार्थक काकड.यांनी सहभाग घेतला. यातील वैशिष्ट्यपुर्ण बाब म्हणजे कु.सार्थक काकड {इ.8 वी } या सर्वात छोट्या सायक्लिस्टने सहभाग घेतला होता. प्रविण कोकाटे व किसन काकड यांच्या सहकार्याने ही फेरी अतिशय उत्साहपुर्ण वातावरणात पार पडली.

शहरातील वाढत्या चारचाकींमुळे प्रदूषण वाढते आहे. याला आळा घालण्यासाठी सायकलिंग करणे सर्वांत चांगला व आरोग्यदायी उपाय असून, प्रत्येकाने आठवड्यातून किमान एक दिवस सायकल चालविण्याचा निर्धार करावा, असे आयोजकांनी यावेळी सांगितले. समाजात बदल हवा असल्यास त्याची सुरुवात स्वत:पासूनच करावी लागते. शहरात सायकल चालविण्याची संस्कृती रुजविण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संघटना आणि व्यक्तीं नी पुढाकार घेतला पाहिजे. लोकांचा सायकलकडे पाहण्याचा दुय्यम दृष्टिकोन बदलण्याची व सायकलिंगमुळे होणारे फायदे समाजवून सांगितले पाहिजे.

एवढेच करून चालणार नाही, शहरातील मार्केट, मॉल, रेल्वेस्थानक, बसस्थानक अन्य महत्त्वाच्या ठिकाणी सायकल पार्क करण्याची व्यवस्था असावी. सायकल संस्कृती रुजविताना जी वागणूक रस्त्यावरून मोटारसायकल, कार चालविणाऱ्यांना मिळत तीच सायकलिंग करणाऱ्यांना मिळाल्यास सायकल चालविण्याकडे नागरिकांचा कल वाढविण्यास मदत होईल.

यापुढेही चामरलेणी सायकलिस्ट अशाप्रकारे उपक्रम राबविणार असून त्याद्वारे पर्यावरणाला हातभार लावणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!