Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

त्र्यंबकेश्वर येथील प्रसिध्द भद्रकाली माता

Share

त्र्यंबकेश्वर : शारदीय नवरात्रोत्सव सुरु असून राज्यभरात देवीची आराधना मोठ्या भक्तिभावाने होत आहे. शहरात देवीच्या अनेक रूपांपैकी एक रूप भद्रकाली मातेचे असून आसाममध्ये असणाऱ्या भद्रकाली देवीचे प्रतिरूप म्हणून या भद्रकाली देवीकडे पाहिले जाते.

दरम्यान  त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पश्चिम दरवाजा जवळ असलेल्या ऋण मुक्तेश्वर महादेव मंदिराजवळ हे छोटेखानी मंदिर आहे. देवीची दगडी मूर्ती असून अतिशय जुनी मूर्ती आहे. शत्रूचा नाश करणारी, आसाममधील  भद्रकाली देवीचे मंदिर हे त्र्यंबकेश्वरात  पहायला मिळते.

या देवीचे वैशिष्ट्य म्हणजे शत्रू नाश होय. याचा अर्थ शत्रूच्या मनातील दृष्टविचार कमी करणे होय. या मंदिराच्या स्थापनेचा उल्लेख आढळत नसून एका उपासकाच्या हातून या जुन्या मूर्तीची स्थापना झाली असावी, असा कयास बांधला जात आहे. काळाच्या ओघात पूर्वीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

येथील लक्ष्मी नारायण चौक मित्र मंडळ यांनी देवीच्या उत्सवाला सार्वजनिक रूप दिले. यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असून या शारदीय नवरात्र उत्सवासाठी शहरातील अनेकजण कार्यरत असून ही मंडळी स्वखर्चाने उत्सव साजरा करते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!