अंजनेरी : गाजरवाडी येथील विहरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लास जीवदान
Share

अंजनेरी : अंजनेरी जवळील गाजरवाडी येथून विहरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लास बाहेर काढण्यात यश मिळाले आहेत.
गाजरवाडी येथील शेतकरी प्रताप बाजीराव पुंड यांच्या शेतातील विहरीत पाच महिने असलेले बिबट्याचे पिल्लू पडल्याचे निदर्शनास आले.
यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात येऊन या मादी पिल्लास सुरक्षितरित्या आज सकाळी दहा वाजता रेस्क्यू करण्यात आले.
यावेळी वनविभागाचे संजय भंडारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, विजय टेकनर, वनरक्षक विंचूर, भय्या शेख, वनसेवक व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.