Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

त्र्यंबकेश्वर : आंबोली धरण ओव्हरफ्लो; परिसरात भात शेती पाण्याखाली

Share

आंबोली : मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या संततधारेमुळे परिसरातील छोटे छोटे बंधारे भरले असून यामुळे शेती परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान बोंबिलटेक ते धुमोडी रस्ता पाण्याखाली आल्याने स्थानिक नागरिकांची गैरसोय झाली आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात काल पासुन १७० मीमी पाऊसाची नोंद झाली असुन आंबोली धरण ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्याद्वारे पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. यामुळे नदीला पूराचे स्वरूप आले असुन नदीच्या लगत असलेली भात शेती पूर्णतः पाण्याखाली आली आहे.

या पूराच्या पाण्याने बोंबिलटेक ते धुमोडी रस्ता नदीच्या पुराने वाहुन गेला असुन येथील स्थानिकाना शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. तसेच सकाळी ढुढा घेऊन जाणाऱ्या व विद्यार्थी वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली असून यामुळे दिवसभराचे नियोजन कोलमडले आहे. नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे  या प्रवाहातुन प्रवास करणे धोक्याचे असल्याने रस्ता पूर्णतः बंद झाला आहे.

या पुराच्या पाण्यात भट शेती वाहून गेल्याने स्थानिक नागरिकांनी मदतीची मागणी केली आहे. तसेच येथील पुलावर दरवर्षी पूर आल्याने स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!