त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाच्या सात मल्लांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

0

त्र्यंबकेश्वर : मविप्र समाज संस्थेच्या त्र्यंबकेश्वर महाविद्यालय आयोजित शालेय तालुका स्तरीय कुस्तीस्पर्धेत सात विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

प्रा माधव खालकर यांनी खेळाडुंना कुस्तीविषयक मार्गदर्शन केले तर मुख्याध्यापक धोंडगे यांनी उद्घाटन केले.17 वर्षाआतील मुलांमधे अक्षय दिलीप काळे, महेश कृष्णा पेहरे यांनी बाजी मारली. तर 19 वर्षाआतील मुलांमधे विष्णू रामकृष्ण भडागे, हर्षद बाजीराव काशीद, निखिल रामदास पालवे, रामनाथ किसन रणमाळे, गगांधार संतोष दिवे या खेळाडुंनी आपापल्या वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला.

या सर्व कुस्तीपटूंची बलकवडे व्यायामशाळा भगूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. प्राचार्या डॉ वेदश्री थिगळे यांनी खेळाडुंचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

*