Type to search

Breaking News ब्लॉग मुख्य बातम्या

भाग दुसरा : माझा प्रवास – विमान, विमानतळ आणि मी

Share

अमेरिकेला जायचं ठरलं होत. त्यासाठीच पासपोर्ट च कामही अंतिम टप्प्यात आल होत. भाऊ नीरज परांजपे अमेरिकेत न्यूजर्सी या भागात नोकरीनिमित्त वास्तव्यास असल्याने भेटीचे नियोजन ठरले होते. अमेरिकेला  जाण्यासाठी  आमच्या  मनात  विविध  विचारांची  चलबिचल  सुरु झाली.  अमेरिकेत आम्ही जवळपास  सत्तर दिवस राहणार होतो. साधारण १८ जून ते २७ ऑगस्ट  असा आमचा सहलीचा कालावधी होता पण अचानक एक बातमी आली की आमची सहल दादाच्या वैयक्तिक कारणामुळे रद्द होत आहे.  

आम्हाला काय करावं ते काहीच कळत नवह्त पण अखेर १० जून २०१९ या  दिवशी दादाचा  फोन आला की काहीही प्रॉब्लेम नाही. आम्ही एप्रिल मे दरम्यान सर्व बग्स, कपडे खरेदी केली होती.   शिवाय आमची औषधे,डॉक्टरचे मेडिकल प्रमाणपत्र, दैनदिन साहित्य सोबत ठेवले होते.  

साधारणपणे विदेशात जाणारी सर्व विमाने मध्यरात्रीची असतात. १७ जून रोजी आम्ही तिघे दुपारी  १२ वाजता मुंबईला जाण्यासाठी निघालो. मुंबईत पोहोचल्यावर आम्ही रामकृष्ण हॉटेल विलेपार्ले  याठिकाणी आराम केला. दुसर्या दिवशी पहाटे १२: ३० दरम्यान मुंबईच्या छत्रपती शिवाजी  टर्मिनस टी या  विमानतळावर पोहोचलो. 

विमानतळावर पोहोचल्यावर आम्ही दादाला मागील दोनवेळा सोडण्यासाठी आलो होतो. कधीतरी  आम्हालाही संधी मिळेल याचा विचारही मनात आला नवहता. विमानतळावर एक नजर  मारल्यावर आमचा उत्साह अधिकच वृद्धिंगत झाला. सुरुवातीला फाटकाबाहेर उभ्या असलेल्या  सुरक्षा गार्डने कागदपत्रे  तपासली. त्यानंतर  आम्ही  चेकिन  विभागाकडे  गेलो  तेथे  आम्ही  आम्हाला  सोबत  लागत  असणाऱ्या बग्स आमच्याकडे  ठेवल्या    इतर  सामान  आम्ही  अमेरिकेच्या विमानतळावर घेण्यासाठी देऊन टाकल्या.

विमान केएलएम डेल्टाचे होते. आमच्याकडे तीन मुख्य ब्याग्ज आणि दोन लॅपटॉप  बॅग्स आशा  एकूण पाच बॅग्स होत्या.  दरम्यान चेकिन झाल्यावर आम्ही दाखल झालो. सिक्युरिटी  चेक  विभागाकडे यात आमच्या जवळील मोबाईल, चष्मा, बेल्ट, पाकीट, आणि लॅपटॉप बॅग्स चेक  करून इमिग्रेशनकडे गेलो.

या ठिकाणी पासपोर्टवर शिक्का  घेण्यात आला. त्यानंतर विमानाच्या फाटकाकडे जी ७२ कडे  दाखल झालो. पाहते साडे तीन वाजता आमच्या विमानाचे बोर्डिंग झाले. यात आम्ही पासपोर्ट  आणि बोर्डिंगपास दाखवून ऐरब्रिजद्वारे थेट विमानात दाखल झालो. यावेळी आई  वडिलांनी  माझा हात  हातात  धरून  हसून  म्हंटलं  चालला  युएसला ! अखेर  विमान उडाल्यावर आम्ही सुटकेचा  निश्वास टाकला.  

दरम्यान विमानात मोठ्या प्रमाणात प्रवाशांना लागणारे साहित्य उपलब्ध असते. यामध्ये जेवण, सोप्न्याची व्यवस्था, तसेच करमणुकीची साधने देखील असतात. यामध्ये विमानातील असलेल्या  स्किनवर आपले विमान कोणत्या दिशेने जात आहे ते आपल्याला लागणारे आयलँड्स, देश हे सर्व  नकाशातील खुणांमुळे पाहता येऊ शकते.

तसेच करमणूक म्हणून चित्रपट पाहता येऊ शकतो. आपल्याला इंग्रजी, हिंदी या भाषांमधील  विविध चित्रपट, गाणी, गेम्स खेळता येऊ शकतात. विमानात दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थात व्हेज  नॉनव्हेज जेवण, स्नॅक्स, बर्गर, चहा, कॉफी दिली जाते.   

-सलील परांजपे, देशदूत, नाशिक 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!