Type to search

Breaking News ब्लॉग मुख्य बातम्या

Blog | भाग पहिला : माझा प्रवास – अमेरिकेला जायचंय…

Share

मेरिका हा देश परदेशातील लोकांनी एकत्र येऊन निर्माण केलेला देश आहे. वॉशिंग्टन ही अमेरिकेची राजधानी असुन येथील शासनपद्धती ही संघीय शासन पद्धती आहे. येथील लोकांची प्रमुख भाषा इंग्रजी आहे. अमेरिकेचे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका असे दोन भाग पडतात. अमेरिकेच्या सागरी सीमा या कॅनडा आणि रशिया यांना लागून आहेत. परदेशात जाण्यासाठी प्रत्येक मनुष्य सर्वोतोपरी प्रयत्न करत असतो. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यासारख्या देशात भेट देणाऱ्यांपेक्षा अमेरिकेला जाण्याला अधिक पसंती देण्यात येते.

डीएस १६० अर्ज प्रक्रिया
तुम्हाला अमेरिकेचा व्हिसा काढायचा असेल तर, सर्वप्रथम डीएस १६० हा ऑनलाइन अर्ज भरावा लागतो. या अर्जामध्ये सर्वप्रथम आपली वैयक्तिक माहिती भरावी लागते. या अर्जामध्ये प्राथमिक माहिती भरावी लागते. माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला अपॉईनमेंट मिळते. यात आपल्याला एक ठराविक वेळ दिली जाते. दिलेल्या वेळी हजार राहून हि प्रक्रिया पूर्ण करावी लागते. दरम्यान याचे मुख्यालय मुंबई वर्ल्ड ट्रेड सेंटर या ठिकाणी आहे.

दोन दिवस चालणाऱ्या या प्रक्रियेत प्रथम बायोमेट्रिक प्रक्रिया पार पाडावी लागते. सोबत डी एस १६० अर्जाची प्रिंट, पासपोर्ट, आपल्याला मिळालेले टोकन सोबत घेऊन जायचे असते. यानंतर महत्वाचा टप्पा म्हणजे मुलाखत होय. मुलाखतीला जाताना आपण आपल्या सोबत आपला अर्ज, पासपोर्ट, आधारकार्ड सोबत घेऊन जायचे असते.

यामध्ये काही सामान्य प्रश्न विचारले जातात, जसे तुम्ही कशासाठी जात आहात ? कोणाकडे जात आहात ? प्रश्न विचारणारा हा विदेशी किंवा भारतीय देखील असू शकतो. समजा एखाद्या व्यक्तीला विचारलेल्या प्रश्न समजला नाही तर त्याला प्रश्न भाषांतरित करून सांगण्यासाठी इंटरप्रिटरची सोय केलेली असते जर त्यांनी तुमचा पासपोर्ट जमा करून घेतला तर तुम्हाला व्हिसा मिळाला असे समजावे पण येथून बाहेर पडताना आपण अधिक आनंद आपल्या चेहऱ्यावर दाखवू नये.

तिकीट बुकिंग :
तिकीट बुकिंग ही प्रक्रिया अत्यंत महत्वपूर्ण प्रक्रिया आहे. ऑनलाईन तिकीट बुकिंग करता येते. यात एअरलाईन संदर्भात संपूर्ण माहिती उपलब्ध असते. यात तिकिटाचे भाव कसे आणि किती आहेत. आपल्याला परवडणारे आहेत किंवा नाहीत शिवाय आपण किती वेळ मध्ये हॉल्ट घेणार आहोत यावर अवलंबून असते व्हिसाचे अनेक प्रकार असतात एचवन बी, एलवन, एचफोर, बिवनबीटू इत्यादी

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!