परिचारीकेची गळफास घेऊन आत्महत्या

0

नवीन नाशिक (प्रतिनिधी) : येथील अभियंतानगर येथे जाई नाना मोरे ( २३ ) या परिचारीकेने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबड पोलीसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

जाई यांनी जीवनाला कंटाळुन आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. सदर चिट्ठी पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. मयत जाई एका खाजगी रूग्णालयात परिचारीका म्हणुन काम करीत होती.

मयत जाई ही साक्री तालुक्यातील असून अभियंता नगर येथे तीन मैत्रिणींसह रहात होती. पुढील तपास पोलीस हवालदार एस.टि. शेळके करीत आहेत.

LEAVE A REPLY

*