Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पोलिसांची बेशिस्त रिक्षाचालकांवर करडी नजर; ठिकठिकाणी कारवाई

Share

नाशिक : विनापरमीट, विनामीटर तसेच बेशिस्त रिक्षाचालकांवर आजपासून कडक कारवाई करण्यात येत असून सकाळपासुन ही मोहीम राबविण्यात येत आहे. विविध ५४ ठिकाणी रिक्षा तपासणी नाके सुरू करण्यात येऊन रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.

शहरात २३ हजारांपेक्षा अधिक रिक्षा धावतात. परमीट तसेच इतर अत्यावश्यक कायदेशीर बाबींचा आढावा घेतला असता हजारो रिक्षा बेकायदेशीर असल्याचे दिसून येते. शहरात रिक्षांची संख्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याने प्रामाणिकपणे व्यवसाय करणार्‍या रिक्षाचालकांची पंचाईत होते. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांनी बेशिस्त तसेच नियमबाह्य रिक्षांवर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार शहरात विविध ५४ ठिकाणी तपाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यात वाहतूक शाखेचा एक तर पोलीस चौकीतील एक अशा दोन सेवकांची विभागानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. हे सेवक फक्त स्टॅण्डवरील रिक्षा व्यावसायिकांची माहिती संकलित करणार आहेत. यामुळे एक डेटा पोलिसांकडे उपलब्ध होईल.

रिक्षाथांब्यासाठी अद्ययावत अ‍ॅप तयार करणे, रिक्षाथांब्यावर पोलीस सहाय्यता क्रमांक असलेले बोर्ड लावणे आदी कामेसुद्धा करण्यात येणार आहेत. या मोहिमेदरम्यान स्टिंग ऑपरेशन राबवून मीटरप्रमाणे रिक्षा न चालवणार्‍या व्यावसायिकांवरसुद्धा कारवाई करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर दोन्ही परिमंडळातील पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखेच्या युनिटचे सर्व पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि वाहतूक शाखेचे सेवक उपस्थित यांच्या बैठका होऊन त्यांना सुचना करण्यात आल्या आहेत.

पुढील आठवड्यात स्कुल रिक्षावर लक्ष
एक आठवड्यानंतर शहरातील स्कूल व्हॅन, रिक्षा व्यावसायिकांना रडारवर घेण्याचे नियोजन आजच्या बैठकीदरम्यान पार पडले. मात्र ही कार्यवाही हाती घेण्यापूर्वी मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येणार असून त्यांच्याकडून तसे हमीपत्रसुद्धा भरून घेण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगीतले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!