Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिकचे कोकण कचरा, प्लास्टिक आणि उपद्रवी पर्यटकांच्या विळख्यात

Share

नाशिक | गोकुळ पवार : सध्या पाऊस नसला तरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे हिरवाई नटलेली आहे. आजही शहरातील पर्यटक लांब न जाता नाशिकपासून जवळ असणाऱ्या पर्यटनस्थळांना पसंती देतात. परंतु गेल्या काही वर्षांपासून या पर्यटनस्थळांना नजर लागली आहे का ? असं वाटायला लागले आहे. कारण पर्यटनस्थळे कचरा, प्लास्टिक आणि उपद्रवी पर्यटकांच्या विळख्यात अडकून पडल्याचे चित्र दिसून येत आहे. .

निसर्गाचे वरदान लाभलेल्या त्र्यंबक सारख्या परिसरात पावसाळ्यात हजारो पर्यटक निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. अंजनेरी, पहिने, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या ठिकाणी पावसाळा सुरु झाल्यापासून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पहिनेला जाताना पेगलवाडी परिसरातच पोलिसांकडून पर्यटकांची तपासणी केली जाते. पंरतु एवढे सगळे होऊनही निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी आलेले पर्यटक पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणावर खाद्य पदार्थ, पाण्याच्या बाटल्या घेऊन जातात. परंतु बऱ्याचवेळा रिकाम्या बाटल्या, खाद्य पदार्थांच्या रिकाम्या पिशव्या, याचा ठिकाणी टाकून निघून जातात. त्यामुळे निसर्गरम्य ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होऊन दुर्गंधी पसरते.

काहीवेळा या ठिकाणी असणारे व्यावसायिक देखील आपल्याकडील कचऱ्याची विल्हेवाट न लावता याच ठिकाणी टाकून देत असतात. त्यामुळे येणारे पर्यटकही येथील व्यवसायिकांचे अनुकरण करत असल्याचे दिसून येत. यासाठी प्रशासनाने व्यावसायिकांवर छाप बसवण्यासाठी काही नियम घालून देणे गरजेचे आहे. ज्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना देखील नियम पाळणे बंधनकारकी राहील.

दरम्यान ही पर्यटनस्थळे सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कचरा डेपो बनत चालली आहेत. स्थानिक पर्यटन विभागाने पर्यटनस्थळांची निगा राखण्याची गरज आहे. मात्र, पर्यटक म्हणून प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखणेही तेवढेच आवश्यक आहे. तरच पर्यटनाचा समृद्ध वारसा जतन होणार आहे.

 

नाशिकचे पर्यटन आजही निराधार                                                                                                                                नाशिकचे पर्यटन आजही निराधार असून अशा ठिकाणी प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे. या ठिकाणी योग्य सुरक्षा यंत्रणा उभारावी. नियम फलक, सूचना फलक, कचरा विल्हेवाटीची व्यवस्था, उपद्रवी पर्यटक यांना आवर घातला पाहिजे. याठिकाणी अधिकृत व प्रशिक्षित गाईड असावे.                                                                                                                                                                        -राम खुर्दळ, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था,नाशिक

पर्यटनस्थळांवर सुरक्षा यंत्रणा हवी                                                                                                                                       अशा ठिकाणी प्रशासनाने पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक असून यामुळे पर्यटक आणत असलेल्या पाण्याच्या बाटल्यांवर निर्बंध येईल. तसेच स्थानिक ठिकाणी वन व्यवस्थापन समिती नेमून त्या ठिकाणी निसर्गाची निखा राखली जाईल तसेच उपद्रवी पर्यटकांवर वचक बसण्यास मदत होईल. पर्यटनस्थळावर सुरक्षिततेसाठी यंत्रणेनेकाही ठोस उपाययोजना करणे अपेक्षित आहे.
-तृप्ती चिंचोळे, पर्यटक

निसर्गाशी संवाद साधा                                                                                                                                                  पर्यटनस्थळांवर पर्यटक म्हणूनच आपण गेले पाहिजे. निसर्गाला बाधा होणार नाही असे आपण वागायला हवे. तसेच स्थानिक व्यावसायिकांनी प्लॅस्टिक बॉटल्स, पिशवी आदींवर निर्बध घालणे आवश्यक आहे. निसर्ग आपलाच असून कचरा केला तर आपल्यालाच त्रास होणंही हे लक्षात घेतले पाहिजे. युवकांनी मिळून पर्यटनस्थळांवर याबाबत जागृती केली पाहिजे. मुळात एक पर्यटक म्हणून आपण निसर्गाशी संवाद साधने आवश्यक आहे.
-स्नेहल जाधव, गृहिणी

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!