Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सहलीचे अमिष दाखवत 55 हजाराची फसवणुक

Share

नाशिक । प्रतिनिधी
गेली काही महिन्यांपासून सहलीसाठी विशेष पॅकेजचे आमीष दाखवून फसवणुक करण्याच्या प्रकारात शहरात वाढ झाली आहे. अशाच प्रकारे कॉलेजरोड येथील आयलांटीस हॉलिडेज कंपनीच्या सेल्स मॅनेजरसह संचालकांनी गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी सुहास मुकुंद कंकरेज (26, रा. मखमलाबाद नाका) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कंपनीच्या सेल्स मॅनेजरसह संचालक विशाल रमेश आल्हाट, जमीर सत्तार मनेर, विठ्ठल नारायण टिंगरे अशा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुहास यांच्या फिर्यादीनुसार संशयितांनी 1 ते 27 मे या कालावधीत सुहास यांना सहलीचे विशेष पॅकेजचे आमीष दाखवून त्यांच्याकडून 55 हजार रुपये घेतले. मात्र पैसे घेतल्यानंतर संशयितांनी सुहास यांना सहलीला पाठवले नाही किंवा इतर सुविधाही दिल्या नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुहास यांनी संशयितांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

या पुर्वी शहरात कमी तिकीट दरात हज यात्रेस पाठविण्याचे आमिष दाखवून एका ट्रव्हल्स कंपनीने अनेकांना गंडा घातल्याचे प्रकार वडाळा परिसरात घडले होते. यासह

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!