Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

उद्या ‘ट्रेक फाऊंडर्स सायकल राईड’ रॅली

Share

नाशिक । प्रतिनिधी
लुथरा एजन्सीस आणि जगातील आघाडीची सायकल उत्पादन कंपनी ट्रेक बायसिकल आयोजित ट्रेक फाऊंडर्स सायकल राईडचे आयोजन रविवारी (दि.२१) करण्यात आले आहे. २२ किमी अतंराच्या रॅलीत १२० सायकलपटू सहभागी होणार असून यावेळी सायकल चळवळीला चालना देण्यासाठी विशेष सेमिनारचेही आयोजन करण्यात आले आहे.

ट्रेक बायसिकलने येथील लुथरा एजन्सिज सोबत रिटेल विक्रीसाठी भागीदारी केले आहे. हे औचित्य साधून ‘ट्रक फाऊंडर सायकल राईडचे आयोजन केले आहे, अशी माहिती लुथरा एजन्सीजचे डिलर पार्टनर राज लुथरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या काही वर्षात शरीर निरोगी ठेवणारी जीवनशैली, क्रीडा प्रकार आणि पर्यावरणाला हातभार लावण्यासह आनंदासाठी सायकलचा वापर वाढत असल्याचे सांगून लुथरा म्हणाले, नाशिकमध्ये वाढते सायकल ‘कल्चर’ लक्षात घेता सामाजिक एकत्रीकरण आणि सर्वसमावेशक ब्रँण्डचा अनुभव देण्याच्या वचनाची पूर्ती म्हणून ट्रेक फाऊंडसर्र् रॅली’ सारखे उपक्रम आम्ही राबवत आहोत.

ट्रेक बायसिकलचे कंट्री मॅनेजर नवनीत बंका यांनी कंपनीच्या विविध ब्रँडची उत्पादने शहरात दाखल झाल्याचे सांगून जगातील वजनाने सर्वात हलकी म्हणजे ५.८८ किलोग्रॅम वजनाची सायकल ट्रेक कंपनीने बाजारात आणल्याची माहिती दिली.

रॅलीमध्ये सायकलपटुंच्या सुरक्षीतेसाठी सर्व उपाययाजेना केल्याचे सांगितले. १४ वर्षावरील सायकटूंचाच रॅलीमध्ये समावेश असणार आहे. याशिवाय ही सायकल रॅली असून यामध्ये स्पर्धा नाही. पायलट कार, मार्शल्स, टेक्निशयन कार, सुरक्षा रक्षक अशी सुरक्षेची उपाययोजना करण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!