स्वाईन फ्लू रोखण्यासाठी सर्व डॉक्टरांना आरोग्य विभागाच्या बैठकीत आवाहन

0

नाशिक । स्वाईन फ्लू चा शहर तसेच जिल्हाभरात वाढता प्रभाव रोखण्यासाठी सर्व डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा असे आवान नाशिक विभागाच्या आरोग्य उपसंचालिका डॉ. रत्ना रावखंडे यांनी येथे केले.

शालिमारच्या आयएमएच्या सभागृहात आज दुपारी 3 वाजता आरोग्य विभगाच्या वतीने सर्व डॉक्टरांची तातडीची बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी डॉ. रावखंडे बोलत होत्या. जिल्ह्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूने डोके वर काढले असून आतापर्यंत सुमारे 16 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

डॉ. रावखंडे म्हणाल्या, स्वाईन फ्लूला तात्काळ प्रतिबंध घालण्यासाठी शासकीय तसेच खासगी डॉक्टारांनी एकत्रीत प्रयत्न  करण्याची गरजेचे आहे. रूग्णांचे निदान लवकर होणे गरजेचे आहे. जेणे त्यांच्यावर उपचार लवकर करणे शक्य आहे. प्रथम रूग्ण हा खासगी डॉक्टरांकडे जातात. त्यांची लक्षणे ओळखून त्यांच्यावर स्वाईन फ्लूचे उपचार तातडीने सुरू होण्याची गरज आहे. यापुर्वी केवळ शासकीय रूग्णालयातच स्वाईन फ्लूची औषधे (टॅमीफ्लू ) उपलब्ध होती. परंतु अन्न व औषध प्रशासनाने या औषधांवरील निर्बंध उठविल्याने ही औषधे सर्व मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध होणार आहेत.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे म्हणाले, जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा वाढता प्रार्दुभाव पाहता त्यास नियंत्रीत आणण्याची जबाबदारी सर्व वैद्यकिय व्यावसायीकांची आहे. रूग्णास सर्दी , खोकला, ताप, घसा खवखवणे अशी लक्षणे आढळून आल्यास रूग्णाला तातडीने स्वाईन फल्यू संदर्भातील उपचार सुरू करावेत. त्याचे निदान लवकर न झाल्यास अथवा उपचारांना विलंब झाल्यास हा आजार बळावून पुढे रूग्ण उपचारांना प्रतिसाद देत नाही व मृत्यू ओढवतो. यामुळे प्राथमिक लक्षणे दिसताच उपचार हा यावरील निर्बधं आहे. यासाठी सर्वांनी साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी नाशिक आरोग्य विभागाचे सह संचालक डॉ. गांडाळ, महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. कोठारी, आयएमएचे अध्यक्ष डॉ. पलोड, शहातील खासगी वैद्यकीय व्यावसायीक संघटना, फिजीशियन, बालरोगतज्ञ, नाक, कान, घास तज्ञ, खासगी वैद्यकीय व्यवसायीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*