Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

एससी प्रवर्गातील सव्वा तीन लाख विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

Share

नाशिक । अजित देसाई
शिक्षण संस्थांमध्ये मॅट्रिकोत्तर विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे शिष्यवृत्ती देण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. राज्यातील 1 लाख 1 हजार 914 विद्यार्थ्यांचे अर्ज समाज कल्याण विभागाकडून अद्याप मंजूर झाले नसून 1 लाख 97 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण संस्थांपातळीवर पडून आहेत. नाशिक विभागाचा विचार केल्यास 51763 पैकी केवळ 4992 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे. परिणामी समाजकल्याण विभागाच्या दिरंगाईचा धोरणामुळे इतर पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

समाज कल्याण विभागातर्फे महाटीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारले जात आहेत. विद्यार्थ्यांचा हा ऑनलाईन अर्ज शिक्षण संस्थेकडून मंजूर झाल्यानंतर समाज कल्याण विभागाकडे पाठविला जातो. परंतु, एससी संवर्गातील शिष्यवृत्ती व फ्री शीपसाठी केलेले अर्ज शिक्षण संस्था व समाज कल्याण विभागाकडे पडून आहेत.

विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी संख्येतही वाढ होत आहे. मात्र, डीबीटी पोर्टलचा वापर करून सद्धा विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होण्यास विलंब होत असल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे.

समाज कल्याण विभागाकडे दि. 18 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील एससी संवर्गातील 3 लाख 95 हजार 160 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व फ्री शीपसाठी अर्ज केले आहेत. मात्र, त्यापैकी 37 हजार 512 अर्ज रद्द करण्यात येऊन पात्र अर्जांपैकी 3 लाख 40 हजार 650 विद्यार्थांचे अर्ज शिक्षण संस्थांनी आणि समाज कल्याण विभागाने मंजूर केले आहेत.

नाशिक विभागातून दाखल 51763 पैकी 45329 विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर स्वीकृत करण्यात येऊन त्यापैकी संस्था पातळीवरून 20621 अर्ज पुढे पाठवण्यात आले आहेत. म्हणजेच 24708 अर्ज संस्था पातळीवर प्रलंबित असून पुढे पाठविण्यात आलेल्या 20621 पैकी केवळ 4992 विद्यार्थ्यांचे अर्ज समाजकल्याण विभागाच्या विभागीय कार्यालयाकडून मंजूर करण्यात आले आहेत.

तर 15629 अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. नाशिक विभागाचा जिल्हानिहाय विचार करता अहमदनगर मधून 1766 पैकी संस्थापातळीवरून केवळ 6969 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत तर धुळे 3257 पैकी 1255, जळगाव 8584 पैकी 3690, नंदूरबार 1411 पैकी 50 तर नाशिकमधून दाखल 20845 पैकी 8657 अर्ज संस्था पातळीवर मंजूर करण्यात आले आहेत.

13.17 टक्के विद्यार्थ्यांना लाभ
विभागाचे नाव नोंदणी अर्ज संख्या शिक्षण संस्थांकडून अर्ज मंजूर विद्यार्थ्यांची वितरीत शिष्यवृत्ती
पुणे 79,359 36,103 4.07 टक्के
नाशिक 51,763 20,621 1.73 टक्के
नागपूर 75,273 33,616 4.29 टक्के
मुंबई 35,588 11,663 1.44 टक्के
लातूर 41,817 12,293 0.82 टक्के
औरंगाबाद 58,602 19,022 0.55 टक्के
अमरावती 52,758 9,782 0.28 टक्के

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!