Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशकात लवकरच तीन सीएनजी स्टेशन्स; ‘या’ तीन ठिकाणी मिळणार सुविधा

Share

नाशिक : सीएनजी भरण्यासाठी आता शहरातच तीन स्टेशन उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅसने नुकतकेच घेतला आहे. त्यामुळे सीएनजी भरण्यासाठी वाहनधारकांना वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान हि तीन स्टेशन पंचवटी, आडगाव आणि चेहेडी, या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने जागा देणार असून जागेचा तिढा सुटल्यानंतर लागलीच या ठिकाणी कामाला सुरवात होणार आहे.

नाशकात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून परिणामी प्रदूषणात भर पडत आहे. त्यामुळे शहरातील वाहनांसाठी कॉप्रेस्ड गॅस (सीएनजी) चे स्थानक उभारण्यात येणार आहेत. यामुळे सीएनजी वाहनांमध्ये नक्कीच वाढ होणार असून साहजिकच प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

दरम्यान चेहेडी येथील ट्रक टर्मिनलजवळ चार हजार चौरस मीटर जागेवर स्टेशन उभे राहणार आहे. पंचवटी येथील स्टेशन हे अग्निशमन केंद्राजवळ एक हजार चौरस मीटरवर होणार आहे. तिसरे स्टेशन हे डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजच्या शेजारी आडगाव येथे दोन हजार चौरस मीटर जागेवर साकारले जाणार आहे.

केंद्र सरकारने या योजनेंतर्गत देशभरातून पहिल्या टप्यात १७४ जिल्ह्यांची निवड केली असून, राज्यातील तीन शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिक, धुळे व सिंधुदुर्ग येथे काम करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच या प्रकल्पाला सुरवात होणार आहे. या योजनेतून घरगुती वापरासाठी नॅचरल गॅस (पीएनजी) व वाहनांसाठी कॉप्रेस्ड गॅस (सीएनजी) सर्वांसाठी पोहचविण्याची ही योजना आहे. यामधील सीएनजी प्रकल्पाचे काम प्रथम सुरु करण्यात येणार आहे. पुढील आठ वर्षांमध्ये शहरात हे काम टप्याटप्याने केले जाणार आहे.

घरगुती वापरासाठी पीएनजी स्टेशन

पाथर्डी फाटा येथे पीएनजीचा प्रकल्प सुरु करण्यात येणार असून यासाठी महापालिकेच्या जागेची निवड करण्यात आली आहे. घरगुती वापरासाठी लागणाऱ्या या गॅसचा पुरवठा या प्रकल्पातून पाइपलाइनने होणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!