Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

वणी-सापुतारा राज्य महामार्गाची हतगडजवळ दयनीय अवस्था

Share

हतगड : बोरगाव, हतगड परिसरात संततधार पावसाने वणी-सापुतारा महामार्गावरील बोरगाव, हतगड, ठाणापाडा या गावा जवळ ठिकठिकाणी महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडल्याने अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने वाहतूक कोंडी देखील होत आहे.

दरम्यान हा मार्ग धार्मिक व पर्यटन स्थळे यांना मुख्य जोडणारा असून या मार्गावर परराज्यातील पर्यटक ,भाविक वाहनांची ये-जा सुरू असते. परंतु बोरगाव , हतगड, ठाणापाडा या गावाजवळ दाट धुके असते. त्यामुळे समोर वाहन धारकांना रस्ता काहीच दिसत नाही. त्यातल्या त्यात महामार्गावर ठिक ठिकाणी मोठे खड्डे पडले असल्याने वाहन तरी चालवावे कसे असा प्रश्न निर्माण होत आहे.

अनेक वेळा खड्डे चुकविण्याच्या नादात वाहने समोरासमोर येत असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यटक व भाविक नाराजी व्यक्त करीत आहेत. या ठिकाणी आल्यानंतर वाहनधारक मार्ग बदलताना दिसतात परंतु इतरही मार्गांची हीच अवस्था झाल्याने भाविक, पर्यटक हतबल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!