Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इंदिरानगर : अज्ञात चोरटयांनी पंचवीस हजाराचे दोन मोबाईल लांबविले

Share

इंदिरानगर । वार्ताहर : घरात चार्जिंगसाठी लावलेले पंचवीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून चोरून नेल्याची घटना वासन नगर पाथर्डी फाटा येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ( दि १५) तुलशी राजेंद्र निकम (वय २२ ) रा वासन नगर पाथर्डी फाटा यांनी आपल्या घरात चार्जिंगला लावलेले पंचवीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरून नेले.

याप्रकरणी निकम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!