Type to search

नाशिक

वाहनांची थर्ड पार्टी विमा दरवाढ १६ जूनपासून लागू होणार

Share

येवला । राजेंद्र शेलार : भारतीय विमा नियामक आणी विकास प्राधिकरणाने वाहन विम्याच्या रकमेत वाढ केली असून हा बदल १६ जूनपासून लागू होणार आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीसोबतच वाहन विमा देखील महागल्याने वाहनधारकांचे कंबरडे मोडणार आहे.

दरवर्षी ०१ एप्रिल पासून वाहन विम्याचे पुनर्चित दर लागू होतात मात्र २०१९-२०२० साठी हे दर १६ जूनपासून लागू होत आहेत. चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या थर्ड पार्टी विम्यात ही दरवाढ लागू होणार आहे. ‘भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणा’ने (इर्डा) वाहनांच्या काही श्रेणींसाठी अनिवार्य थर्ड पार्टी विम्याच्या रकमेत २१ टक्क्यांची वाढ केल्याने विमा महागणार आहे. ‘भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणा’ने (इर्डा) वाहनांच्या काही श्रेणींसाठी अनिवार्य थर्ड पार्टी विम्याच्या रकमेत २१ टक्क्यांची वाढ केल्याने विमा महागणार आहे.

‘इर्डा’ने दिलेल्या आदेशानुसार १००० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या छोट्या कारच्या थर्ड पार्टी विम्यामध्ये १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे थर्ड पार्टी विम्यासाठी सध्याच्या १,८५० रुपयांऐवजी २०७२ रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे १००० ते दीड हजार सीसीच्या वाहनांसाठीचा विमा हप्ता १२.५ टक्क्याने वाढून ३,२२१ रुपयांवर पोहोचला आहे. दीड हजार सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या कारसाठीच्या थर्ड पार्टी विम्याच्या हप्त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. दीड हजार सीसींपेक्षा अधिक क्षमतेच्या कारच्या थर्ड पार्टी विम्यासाठी सध्या ७,८९० रुपये हप्ता आकारण्यात येतो.

दुचाकी वाहनांमध्ये ७५ सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी वाहनांचा थर्ड पार्टी विमा हप्ता १२.८८ टक्क्यांनी वाढवून ४८२ रुपये करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ७५ ते १५० सीसी क्षमतेच्या दुचाकी वाहनांसाठीचा प्रीमियम वाढून ७५२ रुपयांवर पोहोचला आहे. १५० ते ३०० सीसी क्षमतेच्या दुचाकी वाहनांचा थर्ड पार्टी विम्याच्या प्रीमियममध्ये सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. या श्रेणीतील वाहनांचा विमा सध्याच्या ९८५ रुपयांवरून २१.११ टक्क्यांच्या वाढीने १,१९३ रुपयांवर पोहोचला आहे.

सुपरबाइकच्या (३५५ सीसी क्षमतेपेक्षा अधिक) प्रीमियममध्येही कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. कार आणि दुचाकी वाहनांच्या व्यतिरिक्त व्यावसायिक आणि सार्वजनिक वाहनांच्या थर्ड पार्टी प्रीमियमध्येही वाढ करण्यात आली आहे. ई-रिक्षांसाठी खूशखबर असून, त्यांच्या विम्याच्या दरामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. दरम्यान, स्कूलबसच्या थर्ड पार्टी विमा प्रीमियममध्ये वाढ करण्यात आली आहे. कार आणि दुचाकी वाहनांमध्ये दीर्घकालीन प्रीमियमचा कालावधी अनुक्रमे तीन वर्षे आणि पाच वर्षे इतका निर्धारित करण्यात आला आहे.

दुचाकी व चारचाकींवरील थर्ड पार्टी विम्याच्या हप्त्यात एक एप्रिल २०१८ रोजी १० ते २० टक्के कपात करण्यात आली होती. यानंतर चालू वर्षी एक एप्रिलला गेल्या वर्षीचे दर कायम ठेवण्यात आले होते. आता यात पुन्हा १० ते २० टक्के वाढ होणार असल्याने विमा हप्ता पुन्हा एकदा एक एप्रिल २०१८ रोजी घोषित केलेल्या दरांइतकाच होणार आहे.

थर्ड पार्टी विमा दर असे असतील

वाहनाचा तपशील विम्याची रक्कम (रुपयांत)

कार २०७२ (१००० सीसीपेक्षा कमी)

दुचाकी ४८२ (७५सीसीपेक्षा कमी)

दुचाकी ७५२ (७५ ते १५० सीसी)

दुचाकी १,१९३ (१५० ते ३०० सीसी)

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!