Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक विभागात सहा ठिकाणी ‘स्ट्रीट फूड हब’

Share

नाशिक । प्रतिनिधी
शहरातील खवैय्यांसाठी स्वच्छ व गुणवत्तापूर्ण खाद्य संस्कृती जोपासणयासाठी अन्न औषध प्रशासनाद्वारे राज्यात 16 ठिकाणी तर नाशिक विभागात 6 ठिकाणी ‘स्ट्रीट फूड हब’ निर्माण करण्याच्या दृष्टीने विशेष उपाय योजना करण्यात येत असल्याचे अन्न औषध प्रशासनाचे नाशिक विभागाचे सह आयुक्त चंद्रशेखर साळूंके यांनी सांगितले.

शहरातील नागरीकांमध्ये स्ट्रीट फूडची मागणी दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे. त्यांच्या साठी विश्वासार्हता निर्माण करुन गुणवत्तेची हमी असलेल्या परिसराचा विकास करुन त्याठिकाणी स्ट्रट फूड हब उभारण्याची संकल्पना अन्न व औषध प्रशासनाने राज्यात सूरू केलेली आहे. गिरगाव चौपाटी, जूहु चौपाटी परिसरात अधिकृत फलक लावून प्रशासनाने त्या व्यवसायींची नोंदणी करुन त्यांना गूणवत्ता व दर्जा निर्माण करुन देण्यासोबतच त्याच्या व्यवसायाच्या ठिकाणांवर आवश्यक बदल करुन त्या परिसरात ‘स्ट्रीट फूड हब’ निर्माण केले आहे.

यात प्रशासनाच्या माध्यमातून कचर्‍याचे व्यवस्तापन, पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन, सांडपाण्याचे व्यवस्तापन, तियासोबतच स्टॉल परिसराची स्वच्छता, स्टॉलची दूरूस्तीयावर काम केले जाणार आहे. त्यानंतर या सर्व बाबींचे ‘थर्ड पार्टी’ ऑडीटही केले जाणार आहे. त्याचा अहवाल प्राधिकरणाला दिला जाणार आहे.

याच धर्तीवर राज्यात विवीध शहरांमध्ये 16 ठिकाणी हब उभारर्‍यात येणार आहे. नाशिक विभागातील जळगाव येथे दोन तर अहमदनगर येथे एक हब उभारला जाणार आहे. नाशिक शहर परिसरात तीन ‘स्ट्रीट फूड हब’ उभारण्यात येणार आहे. त्यात तिबेटीयन मार्केट, नाशिक रोड व नविन नाशिक परिसराचा विचार पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे रस्त्यावर व्यवसाय करणार्‍या छोट्या व्यवसायीकांना शासनाच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र मिळून ग्राहकांसाठीचा गुरवत्तेचा परवानाच मिळणार असल्याने छोटे व्यवसायीक या ुपक्रमात सहभागी होण्यासाठी उत्सुकता व्यक्त करीत आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!