Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जुने नाशिक संभाजी चौकातील वाडा कोसळला; तीन जखमी

Share

जुने नाशिक । प्रतिनिधी
मागील दोन दिवसांपासून पावसाची संतधार सुरू असल्याने येथील संभाजी चौकातील धोकादायक वाडा पहाटेच्या सुमारास कोसळला. या घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे. यामुळे घटनेमुळे येथील धोकादायक वाड्यांचा विषय पुन्हा चव्हट्यावर आला आहे. मनपाच्या दुर्लक्षामुळे लोकांना जिव मुठीत घेऊन जगावे लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

घटनेत सतीश कुंभकर्ण (वय 50), अमोल सतीश कुंभकर्ण (वय 18) व कल्पना सतीश कुंभकर्ण (वय 40) हे या घटनेत जखमी झाले आहे. त्यांना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज पहाटे 6 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जुना धोकादायक वाडा दुसर्‍या वाड्यावर कोसळल्याने दोन्ही वाड्यांचे मोठे नुकसान झाले.

तांबटगल्ली येथे झालेल्या घटनेला वर्षही झालेला नसतांना पुन्हा वाडा पडल्याच्या घटनेेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील जुने नाशिक भागाती संभाजी चौक परिसरातील काकडे वाडा अचानक कोसळला. त्याचबरोबर जवळील वाड्याची भीत व झाडही कोसळल्याने वाड्यात काही नागरिक अडकले.

तर, वाडा कोसळल्याने परिसरात मोठा आवाज झाल्याने परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ घटनेची माहिती अग्निशामक दलाला कळविण्यात आली. वाडा पडल्याची माहिती मिळताच शिंगाडा तलाव येथील कर्मचारी हॅजमेट रेस्क्यू व्हॅनासह प्रतिसाद वाहनाने घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशामक दलाबरोबर आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, रुग्णवाहिका आदी यंत्रणा तातडीने बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या. वाड्याच्या ढिगार्‍याखाली दबल्या गेलेल्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!