Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

महापोर्टलची पद्धत विद्यार्थ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी

Share
‘महापरीक्षा पोर्टल’ बंदचे स्वागत; Closed Off E Mahapariksha-portal

नाशिक । प्रतिनिधी
शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या महापोर्टलमार्फत शासकीय नोकर भरतीच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जातात, मात्र परीक्षा देण्यासाठी वापर होणारी महापोर्टलची पद्धत विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मानवी हस्तक्षेप टाळावा, परीक्षा वेळेवर लवकर पार पाडावी या हेतूने महापोर्टल सुरू करण्यात आले आहे.

शासनाने 72 हजार जागांची भरती जाहीर केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील भरती सुरू आहे. मात्र, महापोर्टलमार्फत सुरू असलेल्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी येत आहेत. एकाच पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला संगणकाच्या कमी उपलब्धतेमुळे वेळ लागतो. यामध्ये अनेक दिवसांचा कालावधी देखील जातो. एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देता येत नाही. त्यातून काहींच्या वाट्याला सोपा तर काहींच्या वाट्याला अवघड पेपर येतो. त्यावर परीक्षेची गुणवत्ता ठरली जाते.

परिणामी विद्यार्थी या पद्धतीमुळे नाखुश आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेशिवाय होणार्‍या परीक्षा या पोर्टलवर घेण्यात येत आहेत. त्यामुळे एमपीएससीच्या पार्श्वभूमीवर स्वायत्त मंडळ निर्माण करून परीक्षा घ्याव्यात. शासनाने पूर्वी प्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांने केली आहे. पूर्वी ऑफलाईन पद्धतीमुळे विद्यार्थ्याला त्याचे गुण, त्याने सोडविलेले प्रश्न आदी माहिती मिळत असे. त्यामुळे तुलनेने ऑफलाईन पद्धत विद्यार्थ्यांसाठी पारदर्शी होती.

गरज भासल्यास विद्यार्थ्यांना न्यायालयात त्यांच्या उत्तर पत्रिका पुरावा स्वरूपात सादर करणे शक्य होते. मात्र, महापोर्टलमुळे परीक्षेचा कोणताही पुरावा विद्यार्थ्यांच्या हाती राहत नाही. न्यायालयात जाण्यासाठी असणारा मूळ आधार हरविल्याची विद्यार्थ्यांची भावना आहे. तसेच महापोर्टलमध्ये संगणकावर शुल्काची झालेली वाढ सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारी नाही.

शासनाच्या वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी शासकीय परीक्षा नवीन पद्धतीद्वारे घेण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र, प्रश्नपत्रिका बनविणे, परीक्षा केंद्र सुचविणे, परीक्षा घेणे, उत्तर पत्रिका तपासणे, निकाल लावणे ही कामे महापोर्टल करीत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!