Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : बागलाणच्या पश्चिम भागास वरदान ठरलेले केळझर धरण ओवरफ्लो

Share

डांगसौंदाणे | नीलेश गौतम :  बागलाणच्या पश्चिम भागास वरदान ठरलेले ५७२ दलघफु क्षमता असलेले केळझर (गोपाळ सागर) धरण सततच्या कोसळत असलेल्या संततधारेने आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरून धरणाच्या सांडव्यावरून सुमारे तीन हजार क्‍युसेक च्या प्रवाहाने आरम नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने आरम नदिपात्रात केळझर धरणातून ४००० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदी पात्रात पुर परीस्थिती निर्माण झाली आहे.

केळझर धरण

बागलाण तालुक्यातील केळझर धरण ओव्हरफ्लो; आराम नदीत विसर्ग

Deshdoot यांनी वर पोस्ट केले सोमवार, ५ ऑगस्ट, २०१९

राज्यात सर्वदूर होत असलेल्या पाऊसामुळे राज्यातील सर्व धरणे ओसंडून वाहत असताना केळझर मध्यम लघू प्रकल्प परिसरात गेली दोन महिने पाऊसच नसल्याने धरण गतसप्ताहात कोरडेठाक होते. या आठवड्यात राज्यात सगळीकडे पडत असलेल्या पावसांचे आगमन याही भागात जोरदारपणे झाल्याने अवघ्या पाच ते सहा दिवसात केळझर ओसंडून वाहू लागले आहे. बागलाणचा बहुतांशी भाग शेती सिंचनाखाली आणण्यात केळझर धरणाच्या पाणलोट क्षेत्राचा मोठा फायदा होतो

पश्चिम भागातील डांगसौंदाने सह ततानी, साकोडे बुंधाटे ,करंजखेड, दहिंदुले, निकवेल, डांगसौंदाणे, मुंजवाड, मळगाव, आराईसह सटाणा शहराला या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. तर डाव्या कालव्याद्वारे कऱ्हाळेपाडा, भिलदर, वटार, विरगाव, किकवारी, जोरण, कपालेश्वर वनोली, आदी गावांना रब्बीच्या हंगामासाठी फायदा होत असल्याने केळझर धरणा कड़े संपूर्ण बागलाण तालुक्याचे लक्ष लागून होते.

आज सकाळी धरण ओव्हरफ्लो होऊन सांडव्यावरून 4000हजार क्यूसेक च्या प्रवाहाने आरम नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे .धरण लाभ क्षेत्रात आजही दिवसभर संततधार सुरू असून आरम नदीपात्राला महापूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे नदीकाठच्या गावांना व नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!